Download App

Sharad Pawar : ‘कंत्राटी’चा वाद पेटला! पवारांनी बावनकुळेंची लायकीच काढली; म्हणाले, ज्या व्यक्तीबद्दल..

Sharad Pawar : राज्य सरकारच्या कंत्राटी भरतीच्या निर्णयावर विरोधकांनी मोठा गदारोळ केल्यानंतर काल अखेर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी कंत्राटी भरतीचा जीआर रद्द केल्याची घोषणा केली. या निर्णयाची माहिती देताना त्यांनी आधीच्या महाविकास आघाडी सरकारवर याचे खापर फोडले. त्यांच्याच काळात कंत्राटी भरतीचे निर्णय घेण्यात आले होते. त्यामुळे त्यांचे पाप आमच्या माथी नको, असे म्हणत त्यांनी हे निर्णय रद्द केल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले होते. त्यानंतर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनीही आक्रमक भुमिका घेत शरद पवार (Sharad Pawar) आणि तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी नाक घासून माफी मागावी अशी मागणी केली होती. त्यांच्या या वक्तव्यावर आता राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार यांनी जोरदार पलटवार केला आहे.

मनोज जरांगे यांची मोठी घोषणा; 24 ऑक्टोबरनंतर आमरण उपोषण करणार

शरद पवार यांनी आज बारामतीत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी पत्रकारांनी त्यांनी बावनकुळेंच्या वक्तव्याबद्दल विचारले. त्यावर पवार म्हणाले, या गृहस्थांचं समाजात, जनमानसात नक्की काय स्थान आहे हे मला माहिती नाही. एकच उदाहरण सांगतो. ते भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आहेत. मागील विधानसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाने त्यांना तिकीटही दिलं नव्हतं. ज्या व्यक्तीबद्दल स्वतःचा पक्ष तिकीट द्यायलाही लायक नाही असं म्हणतो त्याच्यावर आपण काय भाष्य करायचं.

बावनकुळे बारामतीवर बोलतात कारण लोकांनी बातमी वाचावी आणि बातमी छापावी असं वाटत असेल तर बारामतीचं नाव घ्यावं लागतं. त्यामुळेच त्यांच्याकडून बारामतीचा उल्लेख सारखा केला जातो. जे पक्षाला तिकीट देण्यासाठीही योग्य वाटत नाहीत त्यांनी बारामतीवर चर्चा करण्याचं काहीच कारण नाही, अशा तिखट शब्दांत पवार यांनी बावनकुळेंना प्रत्युत्तर दिले.

‘देवेंद्र फडणवीसांनी माफी मागावी’; कंत्राटी भरतीच्या जीआरवरुन सुळे-फडणवीसांची जुगलबंदी

करारा जवाब मिलेगा, आव्हाडांनीही फटकारलं 

शरद पवार साहेब व उद्धव ठाकरे ह्यांना लाज वाटली नाही का? असं म्हणणारा हा मंत्री उद्धव ठाकरेंबरोबर मंत्री होता आणि बाकीचे आठ जण हे सुशीलकुमार शिंदे व पृथ्वीराज चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात होते. पवार साहेबांची व उद्धव साहेबांची लाज काढण्याइतके आपण मोठे झालात ? करारा जवाब मिलेगा.. असा इशारा शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी काल एका ट्विटद्वारे बावनकुळेंना दिला होता.

Tags

follow us