Ramesh Thorat News : आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांकडून जोरदार हालचाली सुरु आहे. तर मतदारसंघातून विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांच्याही हालचाली सुरु झाल्या आहेत. अशातच आता दौंड मतदारसंघात अजित पवार यांचा शिलेदार रमेश थोरात (Ramesh Thorat) शरद पवार (Sharad Pawar Group) गटाच्या गळाला लागण्याची शक्यता आहे. दौंड मतदारसंघात भाजपचे राहुल कुल हे विद्यमान आमदार आहेत. त्यामुळे दौंडची जागा भाजपला जाणार असल्याने रमेश थोरात यांनी शरद पवार यांची तुतारी हाती घ्यावी, असा अट्टाहास जनतेचा असल्याचा दावा खुद्द रमेश थोरात यांनी माध्यमांशी बोलताना केलायं. त्यामुळे भाजपचे आमदार राहुल कुल यांचं टेन्शन वाढणार असल्याचं बोललं जात आहे.
लोणीकरांचा पाचवा विजय कोण थांबवणार? ‘मविआ’पुढे चेहरा उभं करण्याचं आव्हान
पुढील काही दिवसांतच राज्यात विधानसभा निवडणूका पार पडणार आहेत. एकीकडे महायुतीत तर दुसरीकडे महाविकास आघाडीकडून जोरदार तयारी सुरु झालीयं. दौंड मतदारसंघाची जागा भाजपकडे जाणार असल्याचं जवळपास निश्चितच मानलं जात आहे. त्यामुळे रमेश थोरात यांना अजित पवार गटाकडून तिकीट नाकारलं जाणार असल्याचं सांगण्यात येत आहे. रमेश थोरात यांनी तुतारी चिन्हावर किंवा अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरावं, असं मतदारांकडून आवाहन केलं जात असल्याचं थोरातांकडून सांगण्यात आलंय.
मुख्यमंत्री साहेब, हीच तुमच्या महायुती सरकाची क्वालिटी का?, शालेय गणवेशावरून रोहित पवारांची टीका
थोरात माध्यमांशी बोलताना म्हणाले, 2009 साली मला तिकीट नाकारण्यात आलं होतं., त्यावेळी मतदारसंघातील जनतेने मला डोक्यावर घेऊन अपक्ष निवडणूक लढवण्यास भाग पाडलं. त्यावेळी माझा विजय झाला होता. त्यामुळे आता अजित पवार गटाकडून तिकीट नाकारल्यास शरद पवार गटाची तुतारी किंवा अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचं थोरात यांनी स्पष्ट केलंय. अद्याप मी याबाबत निर्णय घेतलेला नसून उमेदवारीबाबत शरद पवार आणि अजित पवार यांच्यासोबत माझी कोणत्याही प्रकारची चर्चा झालेली नाही, मात्र, आचारसंहितेच्या आधी मी निर्णय घेणार असल्याचं थोरातांकडून सांगण्यात आलयं.
दरम्यान, जनतेच्या मताचा मी आदर करणार असून आचारसंहिता लागण्याच्या आधी निर्णय घेणार आहे, शरद पवरांनी भेटायला बोलावंल तर जाणार असून शरद पवार हे सर्वांचेच दैवत असल्याचं थोरात यांनी स्पष्ट केलंय.
जनतेच्या मताचा आदर करुनच निर्णय..
मागील 8 दिवसांपासून मी मतदारसंघाचा आढावा घेत असून लोकांच्या भावना समजून घेत आहे. लोकांचे दोनच प्रश्न एक म्हणजे निवडणुकीला उभं राहायला पाहिजे., तुतारीला प्राधान्य द्यायचं अन् तुतारीवर निवडणूक लढवायची तर दुसरा पर्याय म्हणजे अपक्ष निवडणूक लढवण्याचा पर्याय मला लोकांनी दिलायं.मी अद्याप याबाबत निर्णय घेतलेला नसून जनतेच्या मताचा आदर करुनच निर्णय घेणार असल्याचं थोरात यांनी सांगितलंय.