NEET UG 2026 पेपरफुटी प्रकरण: दोषींवर कठोर कारवाई करा; ‘पीटीए’ची सरकारकडे मागणी

नीट पेपर फुटी प्रकरणी पीटीए महाराष्ट्र राज्य संघटनेने तीव्र निषेध केला असून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केलीयं.

नीट परीक्षा गैरप्रकारांचा CBI करणार तपास; देशभरातील गदारोळानंतर केंद्राचा निर्णय

नीट परीक्षा गैरप्रकारांचा CBI करणार तपास; देशभरातील गदारोळानंतर केंद्राचा निर्णय

Neet Exam Paper Leak : वैद्यकीय प्रवेशासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या NEET UG 2026 परीक्षेतील पेपरफुटी आणि मोठ्या प्रमाणावर झालेल्या गैरव्यवहारामुळे देशभरातील २२ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांच्या मेहनतीवर पाणी फिरले आहे. या पार्श्वभूमीवर, ‘प्रोफेशनल टीचर्स असोसिएशन’ (पीटीए) महाराष्ट्र राज्य संघटनेने या पेपरफुटीचा तीव्र निषेध केला असून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. जर या प्रकरणात कोणतेही क्लास संचालक दोषी आढळले, तर संघटना त्यांच्या पाठीशी कधीही उभी राहणार नाही, असा थेट इशाराही संघटनेने दिला आहे.

The Maharashtra Files : न्यायाच्या-संघर्षाच्या फाईल मागचं सत्य उलगडणार, ‘द महाराष्ट्र फाईल्स’च्या ट्रेलरने वाढवली उत्सुकता

​’पीटीए’चे अध्यक्ष प्रशांत कासार आणि सचिव मोहन गावडे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, दिवस-रात्र मेहनत करून अभ्यास करणाऱ्या लाखो गुणवंत विद्यार्थ्यांचे भविष्य या पेपरफुटीमुळे टांगणीला लागले आहे. या प्रकरणाची सीबीआय (CBI) चौकशी सुरू असून, या घोटाळ्याला जबाबदार असणाऱ्या रॅकेटवर, भ्रष्ट अधिकाऱ्यांवर आणि यात सहभागी असणाऱ्या खाजगी क्लासेस चालकांवर कठोर कारवाई करून त्यांना तत्काळ अटक करावी, अशी मागणी संघटनेने केली आहे.

जलद गती न्यायालयाची (Fast Track Court) स्थापना करा

​या प्रकरणातील गुन्हेगारांना लवकरात लवकर आणि जलद गतीने शिक्षा मिळावी, जेणेकरून गुन्हेगारांमध्ये कायद्याचा धाक निर्माण होईल, यासाठी स्वतंत्र जलद गती न्यायालयाची (Fast Track Courts) स्थापना करण्यात यावी, अशी मागणीही पत्रकात करण्यात आली आहे.

​परीक्षा पद्धतीत सुधारणा करण्याची गरज

​NEET सारख्या अत्यंत महत्त्वाच्या परीक्षेत होणाऱ्या पेपरफुटीला आळा घालण्यासाठी परीक्षा पद्धतीचे केंद्रीय स्तरावर आधुनिकीकरण आणि कठोर कायदे करण्याची नितांत गरज आहे. यासाठी संघटनेने खालील महत्त्वाचे मुद्दे आणि मागण्या मांडल्या आहेत :

ऑनलाइन परीक्षा पद्धत:
परीक्षा संपूर्णपणे संगणकावर आधारित (ऑनलाइन) पद्धतीने घेण्यात यावी. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी पुढील वर्षापासून ऑनलाइन परीक्षा घेण्यासंदर्भात केलेल्या घोषणेचे संघटनेने स्वागत केले आहे.

मल्टिपल शिफ्ट्स (टप्प्याटप्प्याने परीक्षा):
संपूर्ण परीक्षा एकाच दिवशी न घेता टप्प्याटप्प्याने किंवा विविध सत्रांत (Multiple Shifts) घेण्याचे नियोजन करावे, ज्यामुळे प्रश्नपत्रिका फुटण्याला आळा बसेल.

​वर्षातून दोनदा परीक्षा : JEE च्या धर्तीवर NEET परीक्षा देखील वर्षातून दोन वेळा घेण्यात यावी. ​

शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात भाजप वरचढ; विधानपरिषदेला मराठवाड्यात भाजपचा नवा डाव

Percentile पद्धतीचा वापर: अनेक परीक्षा स्लॉट ठेवल्यास गुणांच्या सामान्यीकरणासाठी (Normalization) ‘पर्सेंटाईल’ पद्धतीचा वापर करावा. ​गेली २६ वर्ष सर्वसामान्य आणि प्रामाणिक क्लास संचालकांच्या हितासाठी कार्यरत असलेल्या ‘प्रोफेशनल टीचर्स असोसिएशन’ने केंद्र आणि राज्य सरकारकडे या संपूर्ण शिक्षण व्यवस्थेतील पारदर्शकता आणण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना न्याय देण्यासाठी या मागण्या केल्या आहेत.

Exit mobile version