‘GOD’ नावाचा नंबर अन् मनीषा हवालदारच्या पतीच्या मोबाईलमध्ये संशयास्पद चॅट्स; NEET प्रकरणात खरा ‘गॉडफादर’ कोण ?

 NEET Paper Leak  Case :  नीट पेपर फुटी प्रकरणामुळे संपूर्ण देशात एकच खळबळ उडाली असून संतापाची लाट पसरली आहे.  या प्रकरणात आरोपींना

NEET Paper Leak Case

NEET Paper Leak Case

 NEET Paper Leak  Case :  नीट पेपर फुटी प्रकरणामुळे संपूर्ण देशात एकच खळबळ उडाली असून संतापाची लाट पसरली आहे.  या प्रकरणात आरोपींना अटक करुन सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी होत आहे.  तर दुसरीकडे या प्रकरणात सीबीआयने आतापर्यंत पुण्यातून तीन जणांना अटक केली आहे. दोन दिवसांपूर्वी सीबीआयने या प्रकरणात पुण्यातून मनीषा हवालदार हिला अटक केली असून सध्या मनीषाची सखोल चौकशी सुरु करण्यात आली आहे.  तर आता मनीषा हवालदारच्या पतीच्या मोबाइलमध्ये गॉड नावाने सेव्ह केलेल्या नंबरवर अनेक संशयास्पद चॅट्स आढळून आले आहे. त्यामुळे हा गोड कोण? याबाबत आता सीबीआयने तपास सुरु केला आहे.

सध्या समोर आलेल्या माहितीनुसार, पुण्यातून अटक करण्यात आलेली मनीषा हवालदार (Manisha Havaldar) हिच्या पतीच्या मोबाईलमध्ये गॉड या नावाने सेव्ह असलेल्या नंबरसोबत काही संशयास्पद चॅट्स सीबीआयला आढळले आहे. सीबीआयने सेलेब्राइट प्रीमियम या फॉरेन्सिक तंत्रज्ञानाच्या मदतीने मोबाईल तपासाची सुरुवात केली आहे. तर दुसरीकडे मनीषा मांढरे (Manisha Mandhare) हिच्यासोबत व्हॉट्सअ‍ॅप चॅट्स (WhatsApp Chats) डिलीट केल्याची माहिती मनीषा हवालदारांने सीबीआयला दिली आहे.

सीबीआयने या प्रकरणात शुक्रवार 22 मे रोजी पुण्यातून फिजिक्स शिक्षक मनीषा  हवालदार हिला पुण्यातून अटक केली आहे. प्रश्नपत्रिका परीक्षा सुरू होण्यापूर्वी काही विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवले असल्याचा आरोप मनीषा हवालदारवर सीबीआयकडून (CBI) करण्यात आला आहे. या प्रकरणात सीबीआयने मनीषा हवालदार हिच्या निवासस्थानी तपास केला असता सीबीआयला मोबाइल,लॅपटॉप, हार्ड डिस्क, नीट प्रश्नपत्रिकांच्या प्रती, हस्तलिखित नोंदी तसेच विद्यार्थ्यांशी संबंधित कागदपत्रे जप्त केली आहेत. याचबरोबर घरातून सीबीआयला 1 लाख 1 हजार 930 रुपयांची रोकडही हस्तगत करण्यात आली आहे.

देशात पुन्हा वाढणार पेट्रोल आणि डिझेलच्या किमती? BPCL संचालकांनी दिला इशारा

आर्थिक मोबदल्यासाठी मनीषा मांढरेशी संगमत करुन मनीषा हवालदार हिने प्रश्न परीक्षा सुरु होण्यापूर्वी काही विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवले असल्याची माहिती सीबीआयने दिली आहे.

Exit mobile version