Download App

‘जरांगेंच्या चेल्या-चपाट्यांनो औकातीत रहा’; धमकीच्या फोनवरुन लक्ष्मण हाकेंचा इशारा

Laxman Hake News : मनोज जरांगेंच्या चेल्या-चपाट्यांनो औकातीत रहा, मी उद्या नगरच्या सभेला वाजत-गाजत येत असल्याचा इशाराच ओबीसी नेते लक्ष्मण हाके (Laxman Hake News) यांनी दिला आहे. दरम्यान, मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत राज्य सरकारने अध्यादेश काढल्यानंतर ओबीसी नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. अशातच मनोज जरांगे यांच्या पुण्यातील पत्रकार परिषदेवर लक्ष्मण हाके यांनी सडकून टीका केली. त्यानंतर मला धमकीचे शेकडो फोन येत असल्याचा दावा लक्ष्मण हाके यांनी केला आहे.

‘तो’ मसुदा कायद्याच्या कसोटीवर टिकणारा नाही, जरांगेची दादागिरी हाणून पाडणार : भुजबळांचा हल्लाबोल

लक्ष्मण हाके म्हणाले, राज्यात अठरा पगड जातींची आणि ओबीसींची भूमिका मी जेव्हा मांडली तेव्हा मराठा आंदोलक नेते जरांगे पाटलांच्या चेल्या-चपाट्यांनी मला दोन तीन दिवसांत शेकडो कॉलद्वारे जीवे मारण्याची धमकी दिली आहे. यासंदर्भात मी पोलिस अधीक्षक आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदन दिले आहेत. हा महाराष्ट्र फुले-शाहु-आंबेडकरांचा असून राज्याचं गृह खातं सतर्क आहे, महाराष्ट्राचा अजून बिहार झालेला नाही. मनोज जरांगेंच्या चेल्या-चपाट्यांनो तुम्ही अवकातीत रहा, या शब्दांत लक्ष्मण हाकेंनी इशारा दिला आहे.

अर्थसंकल्पीय भाषणात सीतारामन यांनी 35 वेळा पॉलिसी, 26 वेळा भारत अन् 42 वेळा उच्चारलं मोदी

तू उद्या नगरला ये तूझी गाडीच फोडून टाकतो, जीवे मारुन टाकतो, बीड, छत्रपती संभाजीनगरला ये, अशा धमक्या मला येत असल्याचं लक्ष्मण हाकेंनी दावा केला आहे. पण हा लक्ष्मण हाके शिवरायांच्या विचारांचा वारसदार असून फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांचा आहे. राज्यातल्या 18 पगड जातीच्या न्याय हक्कांचं सरक्षण करण्यासाठी मी नगरला रस्त्याने येतोयं हेलिकॉप्टरने नाही, उद्या नगरला हलगी लावून वाजत गाजत येत असल्याचं लक्ष्मण हाकेंनी मनोज जरांगे यांच्या चेल्या-चपाट्यांना इशाराचा दिला आहे.

काय म्हणाले होते हाके?
मनोज जरांगे यांचा बोलावता धनी कोण आहे, त्यांच्या आंदोलनाला कोण फूस लावतं, आरक्षण विरुद्ध बाह्यशक्तींचा त्यांना मोठी फिडींग आहे कारण ओबीसींना जे पाहिजे आहे ते मराठा समाजाला हवं आहे ही त्यांची आग्रहाची मागणी आहे. काय मिळालं ओबीसी समाजाला तुम्ही म्हणताय की ओरबाडून खालंय पण आता तरी कुठं ओबीसींचा सरंपच होतोयं जिल्हा परिषदा ग्रामपंचायतीत कुठतरी ग्रामपंचायत सदस्य होत आहे, तुम्ही इथली कारखानदारी, शिक्षणसंस्थेवर काहीच बोलत नाहीत विधानसभेत प्रतिनिधीत्व करणाऱ्या आमदारांवर अजिबात बोलत नाही, खासदारांवर कधीही बोलत नाहीत असा हल्लाबोल हाके यांनी केला.

follow us