Pune Rain : गेल्या काही दिवसांपासून पुण्यात पावसाचा जोर कायम असल्याने सामान्य जनजीवन विस्कळीत होत आहे. पुण्यात (Pune Rain) अनेक भागात पाणी साचल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. यातच आता एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार, पुण्यातील कर्वेनगर (Karvenagar) येथील अलंकार पोलीस (Alankar Police) चौकीजवळ अंगावर झाड पडल्याने एकाचा मृत्यू झाला आहे. मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव राहुल जोशी असल्याचे सांगण्यात येत आहे.
माहितीनुसार, कर्वेनगर येथील अलंकार पोलीस चौकीजवळ अंगावर झाड पडल्याने राहुल गंभीर जखमी झाला होता मात्र दवाखान्यात उपचारांसाठी गेल्यावर त्याला मृत घोषित करण्यात आले. मयत राहुल जोशी सिंहगड रोड परिसरात जात होता मात्र अचानक अंगावर झाल पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला असल्याची माहिती सध्या समोर आली आहे.
वैष्णवी हगवणे प्रकरणात CID चौकशी करा नाहीतर…, मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
तर दुसरीकडे मयत राहुल जोशीच्या अंगावर कोसळलेलं झाड हे कुजलेल्या अवस्थेत होते त्यामुळे ते झाड पावसाळ्यापूर्वीच काढण्याचं काम महापालिकेने करायला हवं होतं, कोसळू शकतात अशा फांद्यांची छाटणी देखील करायला हवी होती. मात्र महापालिकेने पावसाळ्यापूर्वी करायची कामे न केल्यामुळे एका तरुणाला जीव गमवावा लागला आहे. महापालिकेच्या या निष्काळजीपणाविरोधात स्थानिकांनी संताप व्यक्त करत आहे.
चार दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट
राज्यात मान्सूनने 12 दिवस आधीच हजेरी लावण्याने पुण्यात पुढील चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. पुण्यात पुढील चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता असल्याने हवामान विभागाकडून पुणेसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी दक्षता घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
सावधान… देशात पुन्हा कोरोना; 1000 हून सक्रिय रुग्ण ; सर्वाधिक ‘या’ राज्यात
तर दुसरीकडे अहिल्यानगर जिल्ह्यात देखील 26 ते 28 मे दरम्यान वीजांच्या कडकडाटासह वादळी वारा व मुसळधार पाऊस होण्याचा शक्यता हवामान खात्यामार्फत वर्तवण्यात आली आहे.