Video : मुंबईनंतर आता पाऊस पुणेकरांना झोडपणार, वेधशाळेचा अंदाज काय?

  • Written By: Published:
Video :  मुंबईनंतर आता पाऊस पुणेकरांना झोडपणार, वेधशाळेचा अंदाज काय?

Monsoon Forcast For Pune : मुंबईत मान्सूनच्या आगमनानंतर पहिल्याच दिवशी धुवाँघार पावसाने (Mumbai Rain) अक्षरक्षः झोडपून काढले असून, अनेक ठिकाणी साठलेल्या पाण्यामुळे वाहनचालाकांसह नागरिकांची तारांबळ उडाली आहे. हवामान खात्याकडून मुंबईत आज रेड अलर्ट देण्यात आलेला असताना आता मुंबईनंतर पाऊस पुणे शहर आणि जिल्ह्याला झोडपणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

Mumbai Rain : मुंबईकरांना पावसाने झोडपले; १३५ मिमी. पावसाची नोंद, १०७ वर्षांचा विक्रम मोडला

पुणे वेधशाळेचा अंदाज काय? 

पुणे वेधशाळेचे शास्त्रज्ञ एस.डी.सानप यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, काल (दि.25) तळकोकणात मान्सून दाखल झाला असून, आज (दि.26) मुंबईतदेखील मान्सूनची जोरदार एन्ट्री झाली आहे. याशिवाय पुणे, सोलापूरमध्येदेखील मान्सूनचे दमदार आगमन झाले असून, मुंबईत आज हेवी रेन फॉल होणार आहे. तसेच पुढील ४ दिवस मुंबईसाठी ऑरेंज अलर्ट वर्तवण्यात आला आहे. साधारणतः मान्सूनचे आगमन राज्यात 8 जूनच्या आसपास होते. मात्र, यंदाच्या वर्षी राज्यात पावसाचे आगमनलवकर झाले आहे.

पहिल्याच पावसात मुंबईची तुंबई! रेल्वे स्थानक, मंत्रालयात पाणीच पाणी…पाहा PHOTO

बारामतीत १३० मिमी. पाऊस

बारामती मध्ये १३० मिमी. पावसाची नोंद करण्यात आली असून, येणाऱ्या ४ दिवसांत पुणे जिल्ह्याला ऑरेंज, तर शहराला यलो अलर्ट देण्यात आला आहे. येणाऱ्या ५ दिवसात मान्सून संपूर्ण राज्यात व्यापला जाणार असून, पुणे, मुंबईसह हवामान खात्याने कोकण आणि मध्य महाराष्ट्रात ऑरेंज अलर्ट वर्तवला असून, पुढील चार दिवस कोकण, मध्य महाराष्ट्रासह संपूर्ण राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

बारामतीमध्ये अवकाळी संकट; नीरा डावा कालवा फुटला, लोकांच्या घरात पाणी, अजितदादांकडून पाहणी

मुंबईत पावसाने मोडला १०७ वर्षांचा विक्रम

कुलाबा येथील किनारी वेधशाळेत सकाळी ८.३० वाजेपर्यंत १३५ मिमी पावसाची नोंद झाली, तर सांताक्रूझ वेधशाळेत ३३ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. कुलाबा वेधशाळेत मे महिन्यात सर्वाधिक २९५ मिमी पाऊस पडला आहे, ज्यामुळे मे १९१८ मध्ये नोंदवलेला २७९.४ मिमीचा मागील विक्रम मोडला आहे. सांताक्रूझ स्थानकावर या महिन्यात आतापर्यंत १९७.८ मिमी पावसाची नोंद झाली असून, मे महिन्यात आतापर्यंतचा सर्वाधिक पाऊस २००० मध्ये ३८७.८ मिमी इतका पडला होता.

 

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube