Maharashtra Weather Update : राज्यात अवकाळी पावसाचा मुक्काम (Maharashtra Weather) वाढला आहे. मे महिना हा प्रचंड उष्णतेचा महिना असतो. परंतु, यंदा हवामानच बदलले आहे. मे महिन्यात सर्वत्र अवकाळी पाऊस (Unseasonal Rain) जोरदार बरसत आहे. या पावसाने वातावरण थंड झाले आहे पण शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. राज्यात आजही अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुणे जिल्ह्यात (Pune Rains) वादळी पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता आहे. सातारा, सांगली, सोलापूर या जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस कोसळणार आहे. या जिल्ह्यांना हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
विदर्भ, कोकण मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (यलो अलर्ट) देण्यात आला आहे. पुणे, सातारा, सांगली, सोलापूर या जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. पुण्यात काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे या काळात काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सावधान! राज्यात ‘अवकाळी’चा मुक्काम वाढला, आजही जोर’धार’; ‘या’ 25 जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट
राज्यात पाऊस पुढील आठवड्यातही हजेरी लावण्याची शक्यता आहे. 20,21 आणि 22 मे रोजी तळ कोकण, गोवा, दक्षिण मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता आहे. 31 मे पर्यंत मान्सून केरळात दाखल होण्याची शक्यता आहे. या राज्यात दाखल होईपर्यंत मुंबईसह कोकण व संपूर्ण महाराष्ट्रात मान्सूनपूर्व पावसाचा अंदाज आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, धाराशिव, लातूर, बीड, परभणी, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांना मान्सूनपूर्व पावसाचा तडाखा बसण्याची शक्यता आहे.
अंदमान निकोबार बेटांवर मान्सूनचं आगमन झालं आहे. या ठिकाणी सध्या हलक्या स्वरुपाचा पाऊस होत आहे. यानंतर पुढील तीन ते चार दिवसांत मान्सून दक्षिण बंगालच्या उपसागरात आणि अंदमानात वाटचाल करणार आहे. नियोजित वेळेच्या एक आठवडा आधीच मान्सून अंदमानात दाखल झाला आहे. पुढील काही दिवसात मान्सून दक्षिण अरबी समुद्र, मालदीव, अंदमान निकोबारसह मध्य बंगालच्या उपसागरात विस्तार करेल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. यानंतर हळूहळू केरळ आणि महाराष्ट्राकडे मान्सून वाटचाल सुरू करील अशी शक्यता आहे.
पुस्तक न वाचताच सत्ताधाऱ्यांना कसं समजलं? शरद पवारांचा फडणवीसांना खोचक टोला