केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या ताफ्याला ओव्हरटेक करणं पडलं महागात; पुण्यात 32 वर्षीय तरूणावर गुन्हा दाखल

Murlidhar Mohol यांच्या सुरक्षेचा ताफा जात असताना भरधाव दुचाकीने त्यांना ओव्हरटेक केल्याचा प्रकार शिवाजीनगर येथील संचेती चौकात घडला.

Murlidhar Mohol Held meeting Pune Municipal Corporation and Police Department

Murlidhar Mohol Held meeting Pune Municipal Corporation and Police Department

Overtaking Union Minister Murlidhar Mohol’s convoy proves costly case registered against a 32-year-old man in Pune : केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या सुरक्षेचा ताफा जात असताना भरधाव दुचाकीने त्यांना ओव्हरटेक केल्याचा प्रकार शिवाजीनगर येथील संचेती चौकात घडला.

मध्य पूर्वेतील तणावामुळे कच्च्या तेलाचे दर भडकणार? ‘ब्रेंट क्रूड ऑइल’ 150 डॉलरपर्यंत जाण्याची शक्यता

या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी नाना पेठेतील शुभम विजय वनित (वय 32) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 13 सप्टेंबर रोजी रात्री साडेआठच्या सुमारास केंद्रीय राज्यमंत्री मोहोळ यांचा ताफा संचैती चौकातून जात होता. त्यावेळी पोलिस कर्मचारी ईश्वर लक्ष्मण भिकुले हे मोहोळ यांच्या सुरक्षेसाठी कर्तव्यावर होते.

iPhone 17 खरेदी करता येणार फक्त 34,355 रुपयांत! जाणून घ्या सर्वात भारी ऑफर

मोहोळ यांचा ताफा चौकातून जात असताना शुभम वनित याने दुचाकी भरधाव आणि निष्काळजीपणे चालवत ताफ्याला ओव्हरटेक केल्याचा आरोप आहे. त्याच्या या पद्धतीच्या वाहनचालकामुळे रस्त्यावरील इतर वाहनचालक तसेच नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता होती, असे पोलिसांनी नमूद केले आहे.

ऊस उत्पादकांपासून साहित्य क्षेत्रापर्यंत दिलासा; राज्य मंत्रिमंडळाचे महत्त्वाचे निर्णय

या घटनेनंतर पोलिस कर्मचारी भिकुले यांच्या तक्रारीवरून शिवाजीनगर पोलिस ठाण्यात शुभम वनित याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

Exit mobile version