PM Modi Pune tour roads closed Use alternate routes : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असून पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Modi) आज महायुतीच्या उमेदवारांसाठी पुण्यामध्ये ( Pune ) जाहीर सभा आणि रोड शो घेणार आहेत. त्यामुळे शहरातील वाहतुकीत आज (29 एप्रिल) दुपारी 4 ते रात्री 9 वाजेपर्यंत वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे आज या मार्गांवरून प्रवास करण्याऐवजी पुणेकरांना पर्यायी मार्गांचा ( alternate routes ) वापर करावा लागणार आहे.
CM Shinde यांच्याकडून प्रचारसभे दरम्यान ज्येष्ठ कलावंत विलासराव रकटेंना मदतीचा हात…
मोदींच्या दौऱ्यानिमित्त पुण्यात वाहतुकीत बदल…
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेनिमित्त शहरातील वाहतुकीत आज (29 एप्रिल) दुपारी 4 ते रात्री 9 वाजेपर्यंत वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिकांनी दुपारी 3 वाजल्यापासून रेस कोर्स आणि आजूबाजूच्या रस्त्याने जाण्याचा टाळावं. आवश्यक असल्यास पर्यायी मार्गाचा वापर करावा असं पुणे वाहतूक पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.
‘हे’ रस्ते बंद; पर्यायी मार्गांचा वापर करा…
यामध्ये शहरातील टर्फ क्लब मुख्य प्रवेशद्वार ते टर्फ क्लब चौक, सोलापूर रोडवरील अर्जुन रोड जंक्शन ते टर्फ क्लब मुख्य प्रवेशद्वार रस्ता, बिशप स्कूल सर्कल ते टर्फ क्लब चौक हे रस्ते बंद असणार आहेत. त्यामुळे नागरिकांना या मार्गांवरून प्रवास करायचा असल्यास पर्यायी मार्गांचा वापर करावा लागणार आहे. नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी पुणे वाहतूक पोलिसांकडून हे अवाहन करण्यात आलं आहे.
भाजपने उमेदवारी दिलेले उज्ज्वल निकम कसाबच्या बिर्याणीवरून ट्रोल; नेमकं प्रकरण काय?
यामध्ये पर्यायी मार्ग म्हणून गोळीबार मैदान चौक लुल्लानगर, भैरोबानाला ते लुल्लानगर, वॉर मेमोरीयल ते घोरपडी ते डोबारवाडी, मोरओढा सदन कमांड कौन्सिल हॉल ब्लू नाईल मार्गे इच्छित स्थळी पोहचावे लागणार आहे. या मार्गांचा वापर करता येणार आहे. तसेच मोदी यांच्या दोन दिवसांच्या पुणे दौऱ्यानिमित्त अति महत्त्वाच्या व्यक्तींची सुरक्षा तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी पुणे शहर आणि परिसरात 27 एप्रिल रोजी रात्री 12 वाजल्यापासून ते 30 एप्रिल रोजी रात्री 12 वाजेपर्यंत हॉट बलून सफारी, पॅराग्लायडिंग, ड्रोन, मायक्रोलाइट एअरोप्लेन या प्रकारच्या अवकाश उड्डाणावर निर्बंध घालण्यात आलेले आहेत.