Amol Balwadkar on Chandrakant Patil: पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी (PMC Election 2026) प्रभाग नऊमधील राष्ट्रवादीच्या उमेदवारांसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची बालेवाडी येथे जोरदार सभा झाली. या सभेत उमेदवार अमोल बालवडकर ( Amol Balwadkar) यांनी मंत्री चंद्रकांत पाटलांना (Chandrakant Patil) यांच्यावर टीका केलीय. एक दादा कार्यकर्ता संपविण्यासाठी कटकारस्थान रचतो, दुसऱ्या बाजूला एका दादा दीड तासात तिकीट देऊन पुनर्वसन करतो. बघा काय विरोधाभास आहे. ही लढाई कार्यकर्त्याविरुद्ध नेत्याची आहे. एक कार्यकर्ता कसा लढतो आहे, हे सर्वांना दाखवायचे आहे. अजितदादांमुळे माझा राजकीय पुर्नजन्म झालाय, असे बालवडकर म्हणाले.
पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खळबळ; अजित पवारांच्या उमेदवारावर गुन्हा दाखल
यावेळी राष्ट्रवादीचे काँग्रेसचे प्रभाग नऊचे उमेदवार गायत्री मेढे-कोकाटे, बाबुराव चांदेरे, पार्वती निम्हण यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. बालवडकर म्हणाले, गेल्या अकरा वर्षांपासून मी सर्व सामान्य कुटुंबातील तरुण समाजसेवा करतो. राजकारणासाठी पक्ष वाढविण्यासाठी देतो. राजकीय महत्वाकांक्षा ठेवतो. एखाद्या विधानसभेसाठी इच्छुक होतो. पण वरिष्ठांचे आदेश एेकूण शब्दाला मान देऊन थांबतो. पक्षाचा उमेदवार एक लाखांपेक्षा जास्त मताने कसा निवडून येतो, यासाठी प्रयत्न करतो. परंतु एेनवेळी माझे तिकीट कापले जाते. मला बेसावध ठेवले जाते. त्या क्षणाला मला सर्वप्रथम आई-वडिल आठवतात. कारण माझ्या आई-वडिलांच्या समोर ‘त्या’ नेत्याने शब्द दिला होता. तुमच्या मुलाला मोठं करेल. मी त्याच्या पाठीशी उभा आहे.
गेल्या 10 वर्षांमध्ये 21 हजार कोटी खर्च अन् 3 कोटीचा भ्रष्टाचार, साटम यांचा ठाकरेंवर आरोप
ज्याचा शेवटा गोड तेथे सर्वच गोड हा हा विषय संपला असे सांगितले आहे. परंतु निवडणुकीत माझे तिकीट बेसावध ठेवून कापले जाते. दीड तास शिल्लक होते. दीड वाजता अजितदादांनी तुमच्याशी बोलायचे असे सांगून बोलवून घेतले आहे. एका क्षणात माझ्यासमोरील दाटलेला अंधार दूर झाला. महाराष्ट्रातील हा एक नेता आहे, असे बालवडकर म्हणाले.
मला राजकीय पुर्नजन्म मिळाला. पण ज्यांनी माझ्या आई-वडिलांच्या डोळ्यात अश्रू आणले. त्यांच्या डोळ्यात नाही येथून पुढेन चार वर्षांत त्यांच्या डोळ्यात अश्रू आणून बदला घेणार. हा कार्यकर्ता दाखवून देईल, असे बालवडकर म्हणाले.
