Download App

स्वारगेट बलात्कार केस; पोलिसांनी तरुणाला ताब्यातही घेतलं, मात्र, तो आरोपी नसून त्याच्यासारखाचं…

यावेळी गाडेच्या अटकेचा घटनाक्रम मोठा थरारक आहे. आरोपी निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांचं पथक तातडीने आरोपीच्या शिरूर

  • Written By: Last Updated:

Swargate Rape Case : पुण्यातील स्वारगेट एसटी स्थानकात २६ वर्षीय तरुणीवर बलात्कार (Rape ) केल्याच्या प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याला अखेर बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. मध्यरात्री दीड वाजताच्या सुमारास शिरुरमधील गुनाट गावात ऊसाच्या शेतात पुणे पोलिसांकडून गाडेची धरपकड करण्यात आली. सध्या तो लष्कर पोलिसांच्या कोठडीत आहे. पहाटेच ससून रुग्णालयात त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून अकरा वाजता त्याला शिवाजीनगर कोर्टात हजर केलं जाणार आहे.

हुबेहूब दिसणारा भाऊ

यावेळी गाडेच्या अटकेचा घटनाक्रम मोठा थरारक आहे. आरोपी निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांचं पथक तातडीने आरोपीच्या शिरूर तालुक्यातील गुनाट या गावी पोहोचलं होतं. आरोपीच्या छायाचित्रावरून पोलिसांनी एका तरुणाला ताब्यातही घेतले. मात्र, तो आरोपी नसून त्याच्यासारखा हुबेहुब दिसणारा त्याचा भाऊ असल्याचं १५-२० मिनिटांनी स्पष्ट झालं. पोलीस आपल्या मागावर असल्याची माहिती या कालावधीत आरोपीला समजली आणि त्याने तेथून पळ काढला.

स्वारगेट अत्याचार प्रकरणाची राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, रहाटकरांचे पोलीस महासंचालकांना पत्र, येत्या 3 दिवसात

शाही बसमध्ये एका सराईत गुन्हेगाराने नोकरदार तरुणीवर बलात्कार केल्याची घटना मंगळवारी (२५ फेब्रुवारी) पहाटे साडेपाच ते सहाच्या दरम्यान घडली. या प्रकरणी स्वारगेट पोलिसांनी दत्तात्रय गाडे (वय ३७, रा. गुनाट, शिरूर) याच्यावर गुन्हा दाखल केला. तरुणीने सकाळी साडेनऊ ते दहाच्या सुमारास पोलिसांत तक्रार दिली. त्यानंतर तपास सुरू होऊन साडेअकरा-बाराच्या सुमारास आरोपी कोण आहे, हे समजले. त्यानंतर त्याच्या गावी पोलिसांचं पथक रवाना झालं.

दुपारी तीनच्या सुमारास पुणे पोलिसांचं पथक गुनाट गावात पोहोचलं होतं. त्यांनी आरोपीच्या घरावर धाड टाकली. तेव्हा घरामध्ये त्याचा भाऊ होता. तो दिसायला अगदी आरोपीसारखा आहे. पोलिसांनी आरोपी समजून त्याला ताब्यात घेतलं. आरोपी ताब्यात आला, या समजातून पोलीस काहीसे निश्चिंत झाले होते. मात्र, दुसरीकडे आरोपीच्या भावाला सर्व प्रकार समजल्यावर, त्याने तो मी नव्हेच, असे सांगून माझा भाऊ माझ्यासारखा दिसतो, तुम्हाला दत्ता गाडे हवाय का, अशी विचारणा केली. हे ऐकून पोलिसांना धक्का बसला.

गुन्हा करून आरोपी गावी गेला. घरी पोहोचल्यानंतर कपडे बदलून तो गावात फेरफटका मारण्यासाठी गेला होता. पोलीस गावात आल्याची बातमी कळाल्याने आरोपी फोन बंद करून पसार झाला, अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिली. पोलिसांनी आरोपीच्या भावाची चौकशी करून त्याला सोडून दिलं.

follow us