चंद्रकांतदादा आणि बालवडकरांमध्ये ‘पोस्टर वॉर’; दोघांचे एकाचवेळी, एकाच भागात महिलांसाठी कार्यक्रम

चंद्रकांत पाटील आणि अमोल बालवडकर यांनी रविवारी महिलांसाठी वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले होते. हे सर्व कार्यक्रम एकाचवेळी आणि एकाच भागात आहेत.

Chankrant Patil And Amol Balwadkar

Chankrant Patil And Amol Balwadkar

Chandrakant Patil Vs Amol Balwadkar: आगामी विधानसभेसाठी (Assembly Election 2024) महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. दोन्ही आघाड्यांमध्ये जागा वाटप अद्याप झालेली नाही. दोघांकडे इच्छुकांची संख्या जास्त आहे. पुण्यातील कोथरुड मतदारसंघामध्ये मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्यासमोर भाजपचे (BJP) माजी नगरसेवक अमोल बालवडकर (Amol Balwadkar) यांनी आव्हान निर्माण केले आहे. बालवडकर यांनी भाजपकडून विधानसभेसाठी तिकीट मागितले आहे. तसेच ते मतदारसंघात गेल्या काही दिवसांपासून अनेक कार्यक्रम आयोजित करत आहेत. आता चंद्रकांत पाटील यांनीही आता वेगवेगळे कार्यक्रम आयोजन सुरुवात केली आहे. त्यामुळे नेत्यांमध्ये वेगवेगळे कार्यक्रम घेण्यासाठी रस्सीखेच सुरू झाली आहे.

सख्खा भाऊ अन् वहिनीनेच काढला काटा; पुण्यातील ‘त्या’ धक्कादायक खु्नाचं गुढ उकललं..

मंत्री चंद्रकांत पाटील यांनी जागर स्त्री सामर्थ्याचा प्रबोधन आणि मनोरंजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. तरी या कार्यक्रमाला आव्हान देत
अमोल बालवडकर फाउंडेशन आयोजित महिलांसाठी खास खेळ पैठणीचा व मंगळागौर हा कार्यक्रम माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांनी आज कोथरुड विधानसभेतील पाषाण येथे आयोजित केला आहे. त्याच प्रकारचा होम मिनिस्टर खेळ पैठणीचा हा कार्यक्रम कोथरुडचे आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनी बाणेर येथे आयोजित केला आहे. हे दोन्ही कार्यक्रम एकाच दिवशी एकाच प्रभागात आयोजित केले गेले आहेत.

“दोषींवर कठोर कारवाई करा”, रेल्वेतील ‘त्या’ मारहाणीच्या घटनेची अजितदादांनी घेतली दखल

विशेष दोघांचेही बॅनर एकाच ठिकाणी लागण्यात आल्याने चर्चेला उधाण आले आहे. चंद्रकांत पाटलांविरोधात अमोल बालवडकर यांनी शड्डू ठोकला आहे. तर आता चंद्रकांत पाटील हे अॅक्शन मोडमध्ये आले आहे. तेही विधानसभेचे जोरदार तयार केली आहे. दोन दिवसांपूर्वी महानगरपालिकेत चंद्रकांत पाटलांनी बाणेर परिसरातील पक्षाच्या माजी नगरसेवकांची बैठक आयोजित केली होती.

दोघांमध्ये शितयुद्ध

चंद्रकांत पाटील यांनी अमोल बालवडकर यांच्यामध्ये शितयुद्ध सुरू झाले आहे. माजी नगरसेवकांच्या बैठकीला चंद्रकांत पाटील यांनी अमोल बालवडकर यांनी बोलविले नव्हते. तर बालवडकर यांनी दहीहंडी उत्साहाच्या निमंत्रण पत्रिकेत चंद्रकांत पाटील यांचे नाव टाकले नव्हते. नंतर बालवडकर यांनी चंद्रकांत पाटील यांना दहिहंडी उत्साहाचे निमंत्रण दिले होते. परंतु चंद्रकांत पाटील यांनी कार्यक्रमाला येणे टाळले होते. त्यामुळे दोघांमध्ये सध्या तिकीटावरून रस्सीखेच सुरू असून, दोघांमध्ये एकप्रकारे शितयुद्ध सुरू आहे.

Exit mobile version