Download App

Video : ‘अनाजी पंत झाले गपगार, वादळाचं नाव शरद पवार’; बालगंधर्वमध्ये गुंजला वन्स मोअर

Sharad Pawar : ‘गाठू या राजा खिंडीत आणू अडचणीत ईडीचं भूत होऊन उन्मत येता नाचत खल कपटाचं घेऊन हत्यार, खवळला सह्याद्रीचा अंगार.. अनाजीपंत झाले गपगार.. वादळाचं नाव शरद पवार… हे शब्द आहेत राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर रचलेल्या पोवाड्याचे. शाहीर राजेंद्र कांबळे यांनी त्यांच्या पहाडी आवाजात गायले अन् खुद्द शरद पवारांसह उपस्थित रसिकांची दाद मिळवून गेले. हा प्रसंग आज पुण्यातील बांलगंधर्व रंगमंदिरात घडला. शरद पवार यांनी शाहिर कांबळे यांना जवळ बोलावून घेत त्यांची पाठ थोपटली.

‘त्यांच्या नुसत्याच वायफळ चर्चा, गृहमंत्री म्हणून सपशेल अपयशी’; राऊतांचा फडणवीसांवर घणाघात

काही दिवसांपूर्वी शरद पवार यांचं ईडी नाट्य चांगलचं गाजलं होतं. ईडीने पवार यांना नोटीस पाठवली होती. चौकशीसाठी बोलावलेले नसताना मात्र पवारांनी ईडीच्या कार्यालयात जाण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर अनेकांनी विनंती केल्यानंतर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी त्यांनी ईडी कार्यालयात जाण्याचा निर्णय स्थगित केला होता. सध्या त्यांच्या चौकशीची गरज नाही. त्यामुळे त्यांनी कार्यालयात येण्याची गरज नाही असं ईडीने स्पष्ट केले होते. त्यानंतरही राज्याच्या राजकारणात हा विषय चर्चेला येतच असतो.

आता तर शाहीर कांबळे यांनी या प्रसंगावर पोवाडा रचून त्याचे उत्कृष्ट सादरीकरण केले. पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर येथे संपादक ज्ञानेश महाराव यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात शाहीर कांबळे यांनी हा पोवाडा सादर केला.

कांबळे यांचा जबरदस्त आवाज, सादरीकरणाची कला, शब्दफेक यांमुळे पोवाडा सरस ठरला. उपस्थितांना टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली. वन्स मोअरही मिळाला. खुद्द पवार यांनीही पोवाडा पुन्हा म्हणा असे हातानेच खुणावले. त्यानंतर शाहीर कांबळे यांनी पोवाड्यातील शेवटचे कडवे पुन्हा गायले.

Maharashtra Rain Alert : राज्यात उद्यापासून मुसळधार पावसाची शक्यता, ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी

35 वर्षांनंतर साहेबांबरोबर फोटो काढला – कांबळे

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासमोर पोवाडा सादर करण्याची संधी मिळाली याचा विशेष आनंद आहे. पवार साहेबांबरोबर फोटो काढण्यासाठी 35 वर्षे प्रयत्न केले पण कधीच संधी मिळाली नाही. दोन चार वेळा कार्यक्रमात साहेबांनी माझा सत्कार केला होता. पण त्यांच्याबरोबर फोटो काही काढता आला नाही. आज मात्र ती संधी मिळाली याचा अतिशय आनंद झाला, असे शाहीर राजेंद्र कांबळे यांनी सांगितले.

Tags

follow us