Pune rave party case : पुण्यात रेव्ह पार्टी सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आणि त्यांनी छापेमारी करत एकनाथ खडसेंच्या जावयाला अटक केली. आपल्या जावयाचा फसवलं जात असल्याचं अगोदर खडसेंनी म्हटलं. (Pune) आता खेवलकरच्या मोबाईलमध्ये काही धक्कादायक व्हिडीओ आणि फोटो पोलिसांना मिळाली आहेत. मुलींना चित्रपटात काम देतो म्हणून त्यांना बोलावले जायचे आणि त्यांच्यावर अत्याचार केले जात असल्याचे रूपाली चाकणकर यांनी म्हटलं आहे.
यासोबतच नाथाभाऊंच्या जावयाच्या मोबाईलमध्ये आरूष नावाने सात मुलींची मोबाईल नंबर सेव्ह होती. हा आरूष दुसरा तिसरा कोणीही नसून हा मुली पोहोचवण्याचं काम करत असल्याचाही दावा चाकणकरांनी केला. काही व्हिडीओमध्ये खेवलकर हा देखील दिसतोय. सतत जावयामुळे आरोप होत असल्याने एकनाथ खडसे स्पष्टच बोलताना दिसले आहेत.
तर जावयाची बाजू घेणार नाही, फाशी द्या; एकनाथ खडसेंचे चाकणकरांना प्रत्युत्तर
आहे जावई…पण मी काय जावयाला म्हटलं का? तू असं कर?, वा रोहिणीताईंनी म्हटले का? तुमचा जावई घरात काय करतो हे माहिती आहे का? तुमचा मुलगा घराबाहेर गेल्यावर काय करतो ते तुम्हाला समजते का? तो दारू पितो…रंडीबाजी करतो…बाहेर गेल्यावर तो काय करतो तो त्याचा पर्सनल प्रश्न आहे. आम्ही त्याला नाही सांगत तू अस कर अशी संतप्त प्रतिक्रिया खडसे यांनी दिली.
सतत होणाऱ्या आरोपांवर पहिल्यांदाच अगदी स्पष्टपणे बोलताना एकनाथ खडसे हे दिसले आहेत. पुण्यात रोहिणी खडसे यांनी शरद पवार यांची भेट घेतलीये. प्रांजल खेवलकर प्रकरणात त्यांनी ही भेट घेतली. हेच नाही तर रोहिणी खडसे यांनी अगदी स्पष्टपणे म्हटलं आहे की, योग्य वेळ आल्यावर मी सर्वांच्या टिकेला उत्तर देईल. मात्र, न्यायालयीन कोठडीत असूनही अजूनही प्रांजल खेवलकर याचा जामिनासाठी कोर्टात अर्ज करण्यात आला नाहीये. काही दिवसांपूर्वीच रोहिणी खडसे आणि प्रांजल खेवलकर यांची भेट झाली.