Download App

“प्रशांतला मनापासून शुभेच्छा” पुण्यातील भावी खासदाराच्या बॅनरवर अजित पवार म्हणतात…

  • Written By: Last Updated:

पुणे शहराचे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांचे पुण्यात भावी खासदार म्हणून बॅनर लागले होते. त्यावर अजित पवार यांना आज प्रश्न विचारण्यात आले. त्यावर “प्रशांतला मनापासून शुभेच्छा” असं उत्तर अजित पवार यांनी दिल. त्यामुळे पुणे लोकसभा मतदारसंघावर राष्ट्रवादी दावा करणार का? याची चर्चा रंगली आहे.

पुण्यात पुणे जिल्हा सहकारी बँकेची आर्थिक परिस्थिती सांगण्यासाठी अजित पवार यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. त्यावेळी त्यांनी पत्रकारांच्या राजकीय प्रश्नांना देखील उत्तर दिली.

यावेळी पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या वाढदिवसाचे बॅनर लागले आहेत. या बॅनरवर जगताप यांच्यापुढे भावी खासदार म्हणून लिहण्यात आले आहे. त्यावर पत्रकारांनी थेट अजित पवार यांनाच प्रश्न विचारला. त्यावर अजित पवार यांनी हसत हसत “प्रशांतला मनापासून शुभेच्छा” असं उत्तर दिलं.

‘त्या शंका-कुशंका…’ बंडाच्या चर्चांवर अजित पवार पुन्हा म्हणाले…

ते पुढे म्हणाले की, “त्यांनी त्या बॅनर नक्की कोणत्या ठिकाणहून भावी खासदार लिहलं नाही. त्यामुळे मी त्याच्याशी बोलून मी तुम्हाला सांगेल.” निवडणूक लढताना प्रत्येकवेळी काही नवे चेहरे, काही जुने चेहरे द्यावे लागतात. तसा आम्ही त्यावेळी विचार करू.

पुणे लोकसभेवर राष्ट्रवादी दावा करणार

सध्या पुणे लोकसभा ही काँग्रेस पक्षाकडे आहे. पुणे हा काँग्रेसचा परंपरागत मतदारसंघ आहे. पण तरीही गेल्या काही दिवसापासून राष्ट्रवादीकडून पुणे लोकसभेवर दावा सांगितला जात आहे. मागील काही वर्षात पुणे शहरातील काँग्रेसची ताकद कमी झाली आहे, याउलट राष्ट्रवादीची ताकद वाढली आहे.

…तेव्हा चंद्रकांत पाटलांनी हात वर केले, आज त्याच हाताने गुंड शरद मोहोळच्या पत्नीला दिला पक्षात प्रवेश

त्यावर देखील अजित पवार यांनी आपल्या पत्रकार भाष्य केलं. ते म्हणाले की, “सध्या अजून निवडणूक जाहीर झाल्या नाहीत. त्यामुळे जेव्हा निवडणूक जाहीर होईल, तेव्हा आम्ही महाविकास आघाडीमध्ये याची चर्चा करू. कोणाची किती ताकद आहे. यावर निर्णय घेऊ.” त्यामुळे एकप्रकारे राष्ट्रवादीकडून पुणे लोकसभेवर दावा केला जात असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

Tags

follow us