Pratap Sarnaik : काही दिवसांपूर्वीच तरुणीवर अत्याचार प्रकरणी चर्चेत असलेल्या स्वारगेट बस स्थानकाला परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी धडक भेट दिली. यावेळी आगाराची दुरावस्था, सोयीसुविधांच्या कमतरतेवरुन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी अधिकाऱ्यांना चांगलंच झापल्याचं पाहायला मिळालंय. कर्तव्य पार पाडण्यात निष्काळजीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांना निलंबनानंतर पुन्हा त्याच पदावर नियुक्त करणे अयोग्य आहे. अशा गंभीर चुका करणाऱ्या अधिकाऱ्यांची यापुढे गय केली जाणार नाही, असे स्पष्ट निर्देश परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी दिले आहेत.
No Handshake साठी टीम इंडियावर होणार कारवाई? जाणून घ्या, काय सांगते ICC ची ‘रूल बुक’
फेब्रुवारी महिन्यात स्वारगेट बसस्थानकावर घडलेल्या धक्कादायक घटनेनंतर काही वरिष्ठ अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली होती, तर वरिष्ठ आणि कनिष्ठ आगार व्यवस्थापकांसह दोन सहायक वाहतूक अधीक्षकांना निलंबित करून त्यांची विभागीय चौकशी लावण्यात आली होती. याबाबतचे निवेदन विधानभवनात मी स्वतः दिले होते.
राज्यात अर्ध्याहून जास्त मंत्री आका, देवेंद्र फडणवीस मोठे आका; ‘बच्चू’भाऊंची कडवी टीका..
त्यानंतर निलंबित अधिकाऱ्यांची विभागीय चौकशी करून ते दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करणे अपेक्षित होते. मात्र, त्यांची बदली इतरत्र न करता पुन्हा त्याच जागेवर नियुक्ती दिल्याचे समोर आले आहे. ही सरळ-सरळ मंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनांची फसवणूक असून, यामुळे दोषींना पाठीशी घातल्याचा संदेश समाजात जातो, असे प्रताप सरनाईक यावेळी म्हणाले आहेत.
“गद्दारांना धडा शिकवणार, बेईमानांना माफी नाही”, लंकेंनी फुंकले ‘झेडपी’ निवडणुकीचे रणशिंग
दत्ता गाडे प्रकरणात निलंबित करण्यात आलेल्या अधिकाऱ्याची विभागीय चौकशी सुरु असतानाही त्याच आगारात पुन्हा काम देण्यात आल्याने सरानाईक यांनी नाराजी व्यक्त केलीयं. यावेळी त्यांनी संबंधित प्रादेशिक व्यवस्थापकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार असल्याचं देखील म्हंटल आहे. तसेच निलंबित अधिकाऱ्यांना तात्काळ इतरत्र बदली देण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत.
“मुंबई महापालिकेत भ्रष्टाचार, आधी कंत्राटदार नंतर टेंडर”, वर्षा गायकवाडांचा सरकारवर हल्लाबोल