No Handshake साठी टीम इंडियावर होणार कारवाई? जाणून घ्या, काय सांगते ICC ची ‘रूल बुक’
पाकिस्तानला हरवल्यानंतर भारतीय खेळाडूंनी त्यांच्याशी हस्तांदोलन केले नाही. चाहत्यांच्या मनात मोठा प्रश्न आहे की यासाठी भारतीय संघाला दंड आकारला जाईल का? नियम काय आहे?

Asia Cup India Vs Pakistan No Handshake Controversy : आशिया कप २०२५ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात रविवारी (दि.14) खेळला गेलेला सामना उत्साहाने भरलेला होता. मात्र, या सामन्यानंतर भारतीय खेळाडूंनी (Team India) केलेल्या कृतीमुळे सर्वांचे लक्ष वेधले असून, भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने सामना जिंकणारा षटकार मारला मात्र, सामना जिंकल्यानंतर यादव आणि दुबे पाकिस्तानच्या खेळाडूंशी परंपरेनुसार हस्तांदोलन (HandShake) न करता थेट पॅव्हेलियनमध्ये गेले. एवढेच नव्हे तर, नाणेफेकीनंतरही सूर्यकुमार यादवने हस्तांदोलन केले नाही. भारतीय खेळाडूंच्या या कृतीमुळे अनेक चर्चा सुरू झाल्या असून, नो हँडशेकसाठी टीम इंडियाच्या खेळाडूंवर कारवाई होणार का? आणि ICC चा रूल बुकमधील नियम नेमका काय सांगतो ते जाणून घेऊया…
पाच एआय प्लॅटफॉर्मची मोठी भविष्यवाणी! ‘ही’; टीम होणार आशिया कप चॅम्पियन
मैदानावर नेमकं काय घडलं?
सहसा क्रिकेटचा सामना संपल्यानंतर, दोन्ही संघ एकमेकांशी हस्तांदोलन करून खिलाडूवृत्ती दाखवतात. त्याचप्रमाणे कालच्या सामन्यानंतरदेखील पाकिस्तानी संघाचे खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ सदस्य भारतीय खेळाडू सामना संपल्यानंतर येऊन हस्तांदोलन करण्याची वाट पाहत राहिले. पण संपूर्ण भारतीय संघ मैदानातून थेट त्यांच्या ड्रेसिंग रूममध्ये गेला. हे केवळ सामना संपल्यानंतरच नव्हे तर, टॉस दरम्यानही सूर्यकुमार यादव आणि सलमान अली आगा यांनी हस्तांदोलन केले नाही. Asia Cup India Vs Pakistan No Handshake Controversy
संपूर्ण घटनेवर पाकिस्तान संतापला
भारतीय खेळाडूंनी हस्तांदोलन न केल्याने पाकिस्तान संघाने संतापाची भावना व्यक्त केली आहे. संघ व्यवस्थापक नवीद अख्तर चीमा यांनी भारतीय संघाच्या अयोग्य वर्तनाविरुद्ध अधिकृत तक्रार दाखल केली आहे. तसेच नवीद चीमा यांनी मॅच रेफरी अँडी पायक्रॉफ्ट यांच्याविरुद्धही अधिकृत निषेध नोंदवला, ज्यांनी दोन्ही संघांच्या कर्णधारांना टॉस दरम्यान हस्तांदोलन न करण्याची विनंती केली होती.
T20 World Cup 2026 कधी होणार? नवी माहिती मिळाली; भारतासाठी मात्र धोक्याची घंटा
हस्तांदोलन करणे आवश्यक आहे का?, नियम काय सांगतो?
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (ICC) नियमांमध्ये हस्तांदोलन आवश्यक असल्याचा उल्लेख नाही. अशा परिस्थितीत, इशारा, दंड किंवा सामन्यावरील बंदी याबद्दल बोलणे उचित ठरणार नाही. पंच आणि खेळाडू सामन्यापूर्वी किंवा नंतर केवळ खेळाच्या भावनेला लक्षात घेऊन हस्तांदोलन करतात. ही परंपरा क्रिकेटशिवाय इतर खेळांमध्येही दिसून येते.
जर खेळाडू जाणूनबुजून हस्तांदोलन करत नसतील तरच ते खेळाच्या भावनेविरुद्ध मानले जाऊ शकते. आयसीसीच्या आचारसंहितेच्या कलम 2.1.8 नुसार, असे वर्तन खेळाच्या भावनेविरुद्ध आणि खेळाच्या प्रतिष्ठेला हानी पोहोचवणारे मानले जाते. याला लेव्हल 1 आणि लेव्हल 2 मध्ये वर्गीकृत करण्यात आले आहे.
संघाला दंड होईल का?
नाही, जेव्हा हस्तांदोलन करण्याचा कोणताही नियम नाही, तेव्हा संघावर किंवा कोणत्याही खेळाडूवर कोणत्याही दंडाचा प्रश्नच उद्भवत नाही. मात्र, जर कोणी या दरम्यान गैरवर्तन केले किंवा काही अपशब्द वापरले तर, दंड आकारला जाऊ शकतो, परंतु कालच्या सामन्यात असे काहीही घडले नाही. परंतु जर एखादा खेळाडूने जाणूनबुजून विरोधी संघ किंवा खेळाडूशी हस्तांदोलन केले नाही तर, ते खेळाच्या भावनेविरुद्ध मानले जाऊ शकते.
Asia Cup : विजेत्या संघावर होणार पैशांचा वर्षाव; बक्षिसाच्या रकमेत एक कोटींची वाढ
हस्तांदोलन न करण्याचं सूर्यकुमार यादव सांगितलं कारण
एकीकडे सामना संपल्यानंतर हास्तांदोलन न करण्यावरून नव्या वादाला तोंड फुटलेलं असताना संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने असे करण्यामागचे कारण सांगितले आहे. सामना संपल्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना यादवने सांगितले की, आमचे सरकार आणि बीसीसीआय, आम्ही एकत्र होतो. एकत्र, आम्ही इथे आलो, आम्ही एक निर्णय घेतला आणि मला असे वाटते की, आम्ही फक्त खेळ खेळण्यासाठी इथे आलो आहोत. आणि आम्ही पाकिस्तानला योग्य उत्तर दिले. आयुष्यात खेळाडूंच्या भावनेपुढे फार कमी गोष्टी असतात, असं सूर्यकुमार यादव म्हणाला.