Download App

Puneet Balan Group : ऑलिंपिक खेळाडू सचिन खिलारीला पुनीत बालन ग्रुप’कडून मोठं बक्षीस जाहीर

युवा उद्योजक व श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचे उत्सव प्रमुख पुनीत बालन यांच्या 'पुनीत बालन ग्रुप'कडून सचिन खिलारीला पाच लाखांचे बक्षिस जाहीर

  • Written By: Last Updated:

Prize to Olympic player Sachin Khilari : पॅरिसमध्ये नुकत्याच पार पडलेल्या पॅरा ऑलिंपिक (Olympic ) स्पर्धेत गोळा फेक मध्ये भारताला सिल्वर मेडल मिळवून देणाऱ्या सचिन खिलारीला युवा उद्योजक व श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचे उत्सव प्रमुख पुनीत बालन यांच्या ‘पुनीत बालन ग्रुप’कडून पाच लाखांचे बक्षिस जाहीर करण्यात आले आहे. तर याच स्पर्धेत या मोसमातील सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या संदीप सरगरला दोन लाखांचे बक्षीस देण्यात येणार आहे.

पॅरिस पॅरालिम्पिक 2024 सचिन खिलारीने रचला इतिहास गोळाफेकमध्ये 1984 नंतर भारताला पदक

देशातील पहिला सार्वजनिक गणपती श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीची आरती खिलारी आणि सरगर यांच्या हस्ते झाली. यावेळी पुनीत बालन यांनी ही घोषणा केली. ‘पुनीत बालन ग्रुप’कडून विविध खेळांच्या विविध स्पर्धांबरोबर खेळांडूना प्रोत्साहन दिले जाते. अनेक खेळांडूना आर्थिक मदतही केली जाते. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत नेमबाजीत कांस्य पदक मिळविणाऱ्या स्वप्निल कुसळेला ११ लाखांचे बक्षीसही ‘पुनीत बालन ग्रुप’कडून देण्यात आले.

डायमंड लीग फायनल खेळणारा पहिला भारतीय ट्रॅक खेळाडू; अविनाश साबळेची ऐतिहासिक कामगिरी

पॅरिसमध्ये पार पडलेल्या पॅरा ऑलम्पिक स्पर्धेत सिल्वर मेडल विजेत्या सचिन खिलारी आणि भाला फेक स्पर्धेत कांस्य पदकाने हुलकावणी दिलेल्या संदीप सरगर यांना प्रोत्साहान देण्यासाठी पुनीत बालन यांनी अनुक्रमे ५ व २ लाखांचं बक्षिस जाहीर केलं आहे. यावेळी दोन्ही खेळाडूंनी पुनीत बालन यांचे आभार मानले तर या खेळाडूनी आगामी काळात चांगली कामगिरी करून भारत देशाला पदके मिळवून द्यावीत, अशी प्रार्थना पुनीत बालन यांनी श्री. गणरायाकडे केली.

follow us