डायमंड लीग फायनल खेळणारा पहिला भारतीय ट्रॅक खेळाडू; अविनाश साबळेची ऐतिहासिक कामगिरी

  • Written By: Published:
डायमंड लीग फायनल खेळणारा पहिला भारतीय ट्रॅक खेळाडू; अविनाश साबळेची ऐतिहासिक कामगिरी

Diamond League Final Avinash Sable : महाराष्ट्राच्या अविनाश साबळेने काल शुक्रवार मध्यरात्री इतिहास घडवला. ३००० मीटर स्टीपलचेस ( अडथळ्यांची शर्यत) स्पर्धेतील राष्ट्रीय विक्रम धारक अविनाश साबळे हा डायमंड लीग (Diamond League) फायनल खेळणारा भारताचा पहिला ट्रॅक अॅथलीट आहे. अविनाशने आज त्याच्या ३०व्या वाढदिवशी ब्रुसेल्समध्ये या विक्रमाला गवसणी घातली.

सुरू होण्याआधीच पॅकअप! क्रिकेटच्या इतिहासात या आठ सामन्यात फक्त पावसाचाच खेळ

जगातील अव्वल १२ खेळाडूंमध्ये झालेल्या या फायनलमध्ये अविनाशसमोर पॅरिस ऑलिम्पिक चॅम्पियन सौफियाने एल बक्काली ( मोरोक्को) आणि कांस्यपदक विजेता अब्राहम किबिवोट ( केनिया) यांचं आव्हान होतं. त्याने पॅरिस डायमंड लीगमध्ये ८:०९.९१ सेकंदाच्या वेळेसह स्वतःचा राष्ट्रीय विक्रम मोडला होता आणि तीन गुण मिळवले. राष्ट्रीय विक्रम मोडण्याची ही दहावी वेळ होती. अवनीशने ऑगस्टमध्ये सिलेसिया डायमंड लीगमध्ये ९:२९.९६ सेकंद वेळेसह १४ वे स्थान मिळविले होते. पण, डायमंड लीगमध्ये पात्र ठरलेल्या अव्वल १२ खेळाडूंपैकी दोघांनी माघार घेतल्याने अविनाशला फायनल खेळण्याची संधी मिळाली. मागच्या डायमंड लीगच्या फायनलसाठी अविनाश पात्र ठरला होता. परंतु, त्याने माघार घेतली होती.

मोरोक्कोचा बक्काली, केनियाचा विलबरफोर्स कोनेस यांनी पहिल्या ४०० मीटर अंतरापर्यंत आघाडी घेतली होती. अविनाश १२व्या क्रमांकवर होता. १२०० मीटर अंतर कापल्यानंतर केनियाचा आमोस सेरेम आणि अब्राहम किबिवोट यांच्यासह इथोपियाचा गेतनेट वेल अव्वल तिघांमध्ये आले. अविनाशही एक क्रम वर सरकला होता. २००० मीटरनंतर बोयूसेल व कोनेस या दोघांनी माघार घेतली आणि अविनाश दहाव्या क्रमांकावर आला. अविनाशची प्रगती होत होती. परंतु, अव्वल तीनमध्ये स्थान मिळवण्यासाठी त्याचे प्रयत्न अपूरे ठरले.

BCCI ला ट्रोल करणाऱ्यांना जशास तसं उत्तर; अफगाणिस्तान बोर्डाने केला मोठा खुलासा

केनियाचा सेरेम ८:०६.९० सेकंदासह अव्वल आला, तर मोरोक्कोचा बक्काली ( ८:०८.६० से.) आणि ट्युनिशियाचा मोहम्मद आमीन ( ८:०९.६८ से.) अनुक्रमे दुसरे व तिसरे आले. भारताच्या अविनाशला ८ मिनिटे १७.०९ सेकंदासह ९व्या क्रमांकावर समाधानी रहावं लागलं. सेरेमने पॅरिस ऑलिम्पिक चॅम्पियनला हरवून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube