Pune Car Accident : पुणे अपघातावर बऱ्याच दिवसांपासून गप्प असलेले उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार आज सविस्तर बोलले आहेत. या प्रकरणात पुणे पोलीस आणि राज्य सरकार योग्य कारवाई करत आहेत. (Ajit Pawar) आम्ही सारखे कॅमेरासमोर येत नाही, याचा अर्थ आम्ही लपवाछपवी करत आहोत, कुणाला तरी पाठिशी घालत आहोत असा त्याचा अर्थ होत नाही. विरोधकांनी काय आरोप करायचे हा त्यांचा अधिकार आहे. (Pune Police) मात्र, ही घटना घडल्यापासून जे जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई झाली आहे अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली आहे.
पुणे हादरलं! शनिवार वाडा परिसरात आढळली बेवारस बॅग; बॉम्बशोध पथकाकडून तपास
चौकशीचे आदेश
या प्रकरणात ससून रुग्णालयातील डॉक्टरही दोषी आढळले, त्यांच्यावरही कारवाई झाली, अल्पवयीन मुलाच्या नावाने कोणाच्या रक्ताचे नमुने पुढे करण्यात आले होते, याची चौकशी करण्यात येते आहे. अपघात घडला तेव्हा हसन मुश्रीफ परदेशात होते. ससून रुग्णालय त्यांच्या वैद्यकीय शिक्षण खात्याच्या कक्षेत येते. त्यांनीही संबंधितांच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. उत्पादन शुल्क खात्याचे मंत्री शंभूराज देसाई यांनीही आपल्या खात्याला सूचना दिल्या आहेत.
लपवाछपवी करत नाही
सध्या प्रकरण सगळ्यांनी गांभीर्याने घेतलं आहे असंही अजित पवार यावेळी म्हणाले आहेत. तसंच, या प्रकरणाचा रोज तपास पुढे सरकत आहे. दोषींवर कारवाई केली जात आहे. आधी मुलाला अटक झाली नव्हती, त्याला नंतर अटक करण्यात आली. त्यानंतर मुलाच्या बापाला, बापाच्या बापालही अटक करण्यात आली. त्यामुळे या प्रकरणात सरकार कोणतीही लपवाछपवी करत नाही असंही पवार यावेळी म्हणाले आहेत.
पुणे अपघात प्रकरणात मोठी बातमी! आरोपीची आई शिवानी अग्रवाल यांना अखेर अटक
लोकप्रतिनिधी या नात्याने जाव लागतं
आपण पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना फोन केला होता का? या प्रश्नावर बोलताना, पुणे पोलीस आयुक्तांना मी कायमच फोन करत असतो. पुण्यातल्या अपघातानंतर दोषींवर योग्य कारवाई करा असं मी सांगितलं होतं. जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून ते माझं कामच आहे असा खुलासा अजित पवार यांनी दिला आहे. त्याचबरोबर कुठेही घटना घडली तरी लोकप्रतिनिधी या नात्याने जाव लागतं. तेथील घटनेची माहिती घ्यावी लागती. त्या अनुषंगाने आमदार सुनिल टिंगरे हा अपघात झाल्यानंतर पोलीस स्टेशनला गेले होते. त्यामध्ये त्यांनी कोणत्याही पोलिसांवर दबाव आणला नाही अशा शब्दांत अजित पवार यांनी टिंगरे यांची पाठराखन केली.