Download App

Pune Accident News : पोलिसांवर राजकीय दबाव? आमदार सुनिल टिगरेंनी दावा खोडला…

Pune Accident News : 19 मेच्या पहाटे दारूच्या नशेत भरधाव कारने दोघांना चिरडणारा अल्पवयीन बिल्डरपुत्र वेदांत अगरवाल प्रकरणात आता नवीन अपडेट

Image Credit: letsupp

Pune Accident News : 19 मेच्या पहाटे दारूच्या नशेत भरधाव कारने दोघांना चिरडणारा अल्पवयीन बिल्डरपुत्र वेदांत अगरवाल (Vedant Agarwal ) प्रकरणात आता नवीन अपडेट समोर आली आहे. या प्रकरणात आमदार सुनिल टिंगरे (Sunil Tingre) यांनी स्पष्टीकर देत कल्याणीनगरमध्ये झालेल्या अपघातानंतर मी  येरवडा पोलिस ठाण्यात गेलो होते मात्र या प्रकरणात पोलिसांवर कोणताही राजकीय दबाव आणला नसल्याचं स्पष्टीकरण आमदार सुनिल टिंगरे यांनी दिला आहे. तसेच या प्रकरणात आरोपीवर कठोर कायदेशीर कारवाई करावी अशा सूचनाही त्यानी यावेळी पोलिसांना दिल्याचे आमदार आमदार सुनिल टिंगरे यांनी सांगितले आहे.

या प्रकरणात आमदार सुनिल टिंगरे यांच्यावर आरोपीला वाचवण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचा आरोप करण्यात येत होता मात्र आता त्यांनी या प्रकरणात स्पष्टीकरण देत संपूर्ण घटनाक्रम सांगितले आहे.

आमदार सुनिल टिंगरे म्हणाले, काल रात्री कल्याणीनगरमध्ये अपघातात दोघांचा झालेला मृत्यू ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे.  दोन्ही मृतांच्या कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी आहे. या प्रकरणात दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल तसेच न्यायव्यवस्थेच्या माध्यमातून अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तरुण-तरुणीला न्याय मिळेल अशी अशा बाळगतो.

आमदार सुनिल टिंगरे पुढे म्हणाले की, माझा या दुर्दैवी अपघाताशी दुरान्वयेही संबंध नाही मात्र तरीही देखील सोशल मीडियावर काही लोकांकडून माझ्याविषयी या प्रकरणात चुकीची आणि बदनामीकारक माहिती शेअर करण्यात येत आहे. याबाबत मी सुरुवातीला दुर्लक्ष केलं परंतु विरोधकांकडून याचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न होत असल्याने या प्रकरणात माझी सविस्तर भूमिका स्पष्ट करणं गरजेचं आहे.

मला पहाटे 3 च्या सुमारास माझ्या कार्यकर्त्यांनी फोन करून या अपघाताबद्दल माहिती दिली तसेच माझे परिचित विशाल आगरवाल यांनीही फोन करू त्यांच्या मुलाचा ॲक्सिडेंट झाल्याचं सांगितले. त्यानंतर मी पहाटे प्रथम घटनास्थळावर आणि नंतर येरवडा पोलिस ठाण्यात गेलो. तिथे पोलीस निरीक्षक हे अपघातातील तरुण-तरुणींना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेल्याचं सांगण्यात आलं. मी त्यांना फोन केला असता त्यांनी 15 मिनिटात येत असल्याचं सांगितले.

पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक साहेबांनी मला अपघाताचा पूर्ण घटनाक्रम सांगितला त्यानंतर मी दोषींवर कठोर कारवाई करावी अशा सूचना पोलिसांना देत  तिथून निघून आलो. मी पोलिसांवर कोणताही दबाव आणला नाही हे पोलिस अधिकारीही कबूल करतील. या प्रकरणात  काल सकाळी 6 वाजता गुन्हा दाखल झाला आणि पुढील न्यायालयीन प्रक्रियाही झाली. मात्र सोशल मीडियावर या प्रकरणात मी पोलिसांवर दबाव आणल्याचा खोडसाळपणा काही लोकांकडून करण्यात येत आहे. यामुळे माझी सार्वजनिक आणि राजकीय जीवनात बदनामी होण्याची शक्यता असल्याने मी सर्व वस्तुस्थिती याठिकाणी नमूद केली आहे. असं आमदार सुनिल टिंगरे म्हणाले.

तर मी  ‘नाईट लाईफ’च्या विरोधात असून याबाबत अनेकदा आवाजही उठवला असून विमाननगर, कल्याणीनगर, खराडी या उच्चभ्रू भागात रात्री उशिरापर्यंत अवैधरित्या सुरु असलेले पब, बार आणि टेरेस हॉटेल तसंच दारु विक्री, मटका धंदा, हुक्का पार्लर, पत्त्याचे क्लब, अमली पदार्थांची विक्री, मसाज पार्लर या अवैध धंद्यांवर कारवाई करण्याबाबत पोलिस आयुक्तांना मी यापूर्वी पत्रही दिले असून याबाबात विधानसभेत आवाजही उठवला असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

सावधान, सिंगापूरमध्ये पुन्हा कोरोनाची लाट, भारतात नवीन व्हेरियंटची एंट्री 

यामुळे माझा या प्रकरणात कोणताही संबंध नसल्याने माझं नाव या प्रकरणात जोडणे हे चुकीचं आणि बदनामीकारक आहे. यामुळे  सूज्ञ नागरीक या अपप्रचाराला बळी पडणार नाहीत असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

follow us

वेब स्टोरीज