Download App

Pune Accident वर रॅप व्हिडीओ करणारा समोर; अल्पवयीन मुलाच्या आईनेही दिलं होतं स्पष्टीकरण

Pune Accident नंतर एक व्हिडिओ व्हायरल झाला. मात्र या रॅप व्हिडीओतील मुलगा अपघातातील मुलगा नसून कंन्टेंट क्रिएटर आहे.

Pune Accident not miner in Rap Video content creator Aryan Neekhra : पुण्यातील कल्याणीनगरमध्ये ( Pune Accident ) 19 मे च्या पहाटे दारूच्या नशेत पोर्शे ही महागडी कार भरधाव वेगात चालवत एका अल्पवयीन ( miner ) मुलाने दोघांना चिरडलं. त्यानंतर एक व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाला. सुरूवातीला हा व्हिडीओ या अल्पवयीन मुलाचा असल्याचं सांगण्यात येत होतं. मात्र या रॅप व्हिडीओतील मुलगा अपघातातील मुलगा नसून कंन्टेंट क्रिएटर अर्यन निखरा ( Aryan Neekhra ) आहे.

दुष्काळाची दाहकता! नगर जिल्ह्यातील गावगाड्याची तहान भागवायला 333 टँकर

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तो रॅप साँग तयार करताना दिसत आहे. या रॅप साँगमध्ये शिवीगाळ करण्यात आले आहे. यामुळे अनेकजण संताप व्यक्त करत होते. मात्र हा मुलगा अपघातातील मुलगा नसून कंन्टेंट क्रिएटर अर्यन निखरा असल्याचं आता समोर आलं आहे. तर सोशल मिडीयावर कंन्टेंट क्रिएटर अर्यन निखरा क्रिंगिस्तान या नावाने आपले अकाउंट चालवतो.

Munjya Trailer : अंगावर काटाच! दिनेश विजानच्या ‘मुंजया’चा धडकी भरवणारा ट्रेलर, पाहा…

तसेच तो एक मिम क्रिएटर आहे. जो दिल्लीतील विकास मार्ग रोड या ठिकाणी असलेल्या नो ग्रॅव्हिटी मीडियासाठी काम करतो. तो मध्य प्रदेशातील असून सध्या दिल्लीत राहत आहे. त्याने हॅपी डे स्कूल शिवपुरी आणि त्यानंतर ग्वालियर या ठिकाणी शिक्षण पूर्ण केलं आहे. सध्या तो सोशल मीडियावर कंटेंट क्रिएटर म्हणून काम करतो.

दरम्यान हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पुणे अपघातातील अल्पवयीन मुलाच्या आईने एक व्हिडिओ पोस्ट केला. ज्यामध्ये त्यांनी व्हायरल होत असलेला रॅप व्हिडीओ आपल्या मुलाचा नसून दुसऱ्या कुणाचा तरी असल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे. यावेळी या मुलाच्या आईला अश्रु अनावर झाल्याचे देखील पाहायला मिळालं होतं.

या प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचा जामीन रद्द करण्यात आला असून त्याची बाल सुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. पोलिसांच्या तपासानंतर तो सज्ञान आहे की अज्ञान हे ठरवलं जाणार आहे. तोपर्यंत त्याला 14 दिवसांसाठी बालसुधारगृहात ठेवण्यात आलं आहे. कल्याणीनगर भागात शनिवारी मध्यरात्री झालेल्या भीषण अपघातात जामीन मिळालेल्या अल्पवयीन बिल्डर पुत्राला बुधवारी (दि.22) बाल हक्क न्यायालयता हजर करण्यात आले. यावेळी सुनावणीदरम्यान बाल हक्क न्यायालयाने निर्णय दिला.

दरम्यान पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पुन्हा एकदा या प्रकरणी पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी पुणे अपघात प्रकरणी रेप व्हिडिओ बनवणाऱ्या मुलावर कारवाई करणार असल्याचे देखील म्हटलं आहे.

follow us