Download App

तयारीचे आदेश आले! विधानसभेसाठी पुण्यातून पवारांचा हुकमी एक्का मैदानात उतरणार

  • Written By: Last Updated:

पुणे : राज्यातील विधानसभेच्या निवडणुकांसाठी (Maharashtra Assembly Election) विविध पक्षांकडून रणनिती आखण्यास सुरूवात करण्यात आली आहे. या सर्व तयारीमध्ये राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी पुणे विधानसभेसाठी तयारीला लागण्याचे आदेश दिले आहेत. आगामी विधानसभेच्या निवडणुकीसाठी हडपसर विधानसभेसाठी शरद पवार त्यांचा हुकमी एक्का मैदानात उतरवणार असून, या नेत्याला तयारी करण्याचे आदेश पवारांनी दिले आहेत.

काल दिल्लीला अन् आज भीमाशंकरला…. मुख्यमंत्री तीर्थयात्रेतच व्यस्त; संजय राऊतांचे टीकास्त्र

पुण्यातील शरद पवारांचा पहिला उमेदवार ठरला
हडपसर विधानसभेसाठी पवारांनी पुणे जिल्ह्यातील पहिला उमेदवार निश्चित केला असून, त्यांचा हुकमी एक्का मैदानात उतरवणार असून, त्यांनी यासाठीची आवश्यक तयारी करण्याचे आदेशदेखील दिले आहेत. आगामी विधानसभेसाठी हडपसरमधून काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप (शरद पवार गट) यांना तयारी करण्याचे देण्यात आले आहेत, अशी माहिती विश्वासू सूत्रांनी दिली आहे.

चेतन तुपेंची साथ कुणाला याबाबत संभ्रम कायम
दुसरीकडे, अजित पवारांच्या बंडानंतर राष्ट्रवादीत उभी फुट पडली असून, राष्ट्रवादीतील अनेक नेत्यांनी अजित पवारांसोबत जाणे पसंत केले आहे. मात्र,आमदार चेतन तुपेंनी अद्यपपर्यंत त्यांची भूमिका स्पष्ट केलेली नाही. त्यामुळे तुपे यांचा नेमका पाठिंबा शरद पवारांना की अजितदादांना याबाबतचा संभ्रम कायम आहे. त्यातच पवारांनी आगामी विधानसभेसाठी हडपसरमधून प्रशांत जगताप (Prashant Jagtap) यांना तयारीला लागण्याचे आदेश दिले आहेत.

Maratha Revervation : मराठवाड्यातील मराठ्यांना आरक्षण मग पश्चिम महाराष्ट्रातल्यांनी घोडे मारले का? चव्हाणांचा सवाल

बंडखोरीनंतर पवारांना साथ देण्यात जगताप आघाडीवर
राष्ट्रवादीत उभी फुट पडल्यानंतर पवारांच्या जवळीने अनेक मोठ्या नेत्यांनी अजितदांदांना साथ देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर पुणे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले होते. त्यावेळी आपण पवारांसोबतच राहणार असल्याचे जगताप यांनी सांगितले. पवारांना पाठिंबा देणारे ते पुण्यातील पहिलेच पदाधिकारी होते. पवारांना पाठिंबा देण्यासोबतच जगतपांनी पुण्यातील शरद पवार यांच्या गटाची बाजू भक्कमपणे लावून धरत अजित पवारांसमोर आव्हान उभे केले आहे.

Sharad Pawar : जे सोडून गेले त्यांच्यासाठी परतीचे दारं बंद; अजितदादांच्या येण्याबाबत पवारांचं मोठं वक्तव्य

काय म्हणाले जगताप?
2019 मध्येदेखील विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी प्रशांत जगताप इच्छुक होते. मात्र हडपसरमधून राष्ट्रवादी काँग्रेसकडून चेतन तुपे यांना संधी देण्यात आली. त्यानंतर म्हणजेच अजितदादांच्या बंडखोरीनंतर जगताप यांनी शरद पवार यांची साथ दिल्यानंतर स्वतः प्रशांत जगताप यांनी पुन्हा एकदा हडपसरमधून लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यानंतर जगताप यांना तयारी करण्याचे आदेश देण्यात आले असल्याचे सांगितले जात आहे. पक्षाने 40 लोकांना नोटीस पाठवली आहे त्यामुळे संबंधित मतदार संघामध्ये पक्षाकडून उमेदवार दिले जाणार आहेत. मी हडपसर मतदार संघामध्ये निवडणूक लढविण्यास इच्छुक असून निवडणूक लढवणार आहे, असं मत जगताप यांनी लेट्सअप मराठीशी बोलताना व्यक्त केलं आहे.

Tags

follow us