Maratha Revervation : मराठवाड्यातील मराठ्यांना आरक्षण मग पश्चिम महाराष्ट्रातल्यांनी घोडे मारले का? चव्हाणांचा सवाल
Maratha Revervation : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे गेल्या 14 दिवसांपासून जालना जिल्ह्यातील अंतरवली गावात उपोषणाला बसले आहेत. आरक्षणाला मिळालेला वाढता प्रतिसाद पाहता सरकारने वंशावळीत कुणबी उल्लेख असणाऱ्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा जीआर शासनाने काढला. मात्र, जरांगे सरसकट आरक्षणाच्या मागणीवर ठाम आहेत. त्यात आता राज्य सरकारने मराठवाड्यातील मराठा समाजाला आरक्षण देण्याची तयारी दाखवत आहे. त्यावर माजी मुख्यमंत्री आणि कॉंग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी सरकारला संतप्त सवाल केला आहे.
Animal Teaser Release Date: रणबीर कपूरच्या ‘ॲनिमल’च्या टीझरबद्दल मोठी अपडेट; ‘या’ दिवशी होणार रिलीज?
काय म्हणाले पृथ्वीराज चव्हाण?
राज्य सरकार मराठवाड्यातील मराठा समाजाला आरक्षण देण्याची तयारी दाखवत आहे. त्यावर माजी मुख्यमंत्री आणि कॉंग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी सरकारला संतप्त सवाल केला आहे. ते म्हणाले की, मराठवाड्यातील मराठ्यांना आरक्षण देण्यात येणार आहे. मग पश्चिम महाराष्ट्रातल्या मराठा समाजाने काय घोडे मारले का? असा संतप्त सवाल चव्हाण यांनी सरकारला केला आहे. तसेच मुख्यमंत्र्यांनी हा अत्यंत चुकीचा निर्णय घेतला आहे. असंही चव्हाण म्हणाले.
Sanya Malhotra: …म्हणून सान्या मल्होत्राने मानले किंग खानचे आभार !
कॉंग्रेसच्या वतीन राज्यात जनसंवाद यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यावेळी सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना चव्हाण यांनी माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. तसेच त्यांनी यावेळी अजित पवार यांनी केलेल्या टीकेला देखील उत्तर दिले. अजित पवार म्हणाले होते की, दिल्लीहून आले तेव्हा चव्हाणांनी आरक्षण का नाही दिले. ते म्हणाले की, सत्तेत गेल्यामुळे अजित पवारांना विसर पडला आहे का? मी मुख्यमंत्री असताना सर्वात पहिले आपण मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. तेव्हा अजित पवार उपमुख्यमंत्री होते.