पुणे : कसब्याचे भाजप उमेदवार हेमंत रासने यांनी घरच्या देवाचं दर्शन घेतलं. त्यानंतर त्यांनी मीच जिंकणार असा विश्वास व्यक्त केला. मागील काही वर्षाच मी केलेल्या कामाला जनतेचं आतापर्यंत भरगोस प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे जनतेचा माझ्यावर विश्वास आहे. ज्या पद्धतीचं रचनात्मक काम भारतीय जनता पार्टीने केलं आहे. त्यामुळे चांगल्या मताधिक्याने भाजपचा म्हणजेच माझा विजय होईल, असा माझा विश्वास आहे, असंही ते म्हणाले. काही वेळातच ते पुण्याच्या दगडूशेठ गणपती मंदिरात दर्शनासाठी येणार आहे.
https://www.youtube.com/watch?v=q3FzJBHFuHE
कसबा , चिंचवड पोटनिवडणुकीची मतमोजणीला सुरुवात झाली आहे. पहिल्या फेरीपासून पिछाडीवर असलेल्या भाजप उमेदवार हेमंत रासने यांनी चौथ्या फेरीअखेर हेमंत रासनेंनी पिछाडी भरुन काढत २०० मतांची आघाडी घेतली आहे.तिसऱ्या फेरीअखेर महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांना ११,७६१ मतं तर हेमंत रासने यांना १०,६७३ मतं पडली आहे. तिसऱ्या फेरीत आघाडी घेतली आहे. धंगेकर यांच्यापेक्षा ६०० मतांनी आघाडी घेतली आहे. तिसऱ्या फेरीअखेर धंगेकरांचं मताधिक्य घटलं असून एकूण ६७७ मतांनी आघाडी आहे.
कसबा पेठ आणि चिंचवड या दोन मतदारसंघात सुरु असलेल्या पोटनिवडणुकीसाठी आज (दि.२) मतमोजणी सुरु झाली आहे. चिंचवडमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार विठ्ठल काटे, भाजपच्या अश्विनी जगताप आणि अपक्ष राहुल कलाटे या तीन उमेदवारांचे भवितव्य तिरंगी लढत होत आहे. कसबा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्याविरोधात भाजपचे हेमंत रासने रिंगणात आहेत.