Download App

भाजपचे लोक आपल्या नेत्याच्या मरणाची वाट पाहतात; शिंदेंनी सुनावले

Pune Congress Leader Arvind Shinde On BJP :  पुण्याचे खासदार  व भाजपचे ज्येष्ठ नेते गिरीश बापट यांचे निधन झाल्याने पुणे लोकसभेची पोटनिवडणुक होणार आहे. अद्याप या जागेच्या पोटनिवडणुकीची घोषणा निवडणुक आयोगाकडून करण्यात आलेली नाही. पण याआधीच सर्वच पक्षातील उमेदवार हे या निवडणुकीसाठी इच्छुक दिसत आहेत.

काही दिवसांपूर्वी भाजपचे पुणे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांचे भावी खासदार म्हणून होर्डिंग लागले होते. त्यावरुन त्यांच्यावर सर्वस्तरातून टीका करण्यात आली होती. एवढेच नाही तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी देखील मुळीक यांच्यावर टीका केली होती. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रशांत जगताप यांचे भावी खासदार म्हणून होर्डिंग लागले आहे. त्यांनी देखील ही जागा लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

Letsupp Special : Ajit Pawar यांचा स्पष्टवक्तेपणा अशा वेळी कोठे जातो?

पण पुणे शहर लोकसभेची जागा ही परंपरागत काँग्रेसकडे आहे. यावरुन पुणे शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष अरविंद शिंदे यांच्याशी खास लेट्सअपने चर्चा केली आहे. ही जागा आमची आहे. त्यामुळे ही जागा आम्ही मागण्याच्या प्रश्नच नाही. आम्ही शांतपणे निवडणूक लढवू, असे ते म्हणाले आहेत.

आमची संस्कृती अशी सांगते की ज्या दिवशी निवडणुका जाहीर होतील त्यादिवशी आम्ही यावर बोलू, असे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांना भाजपवर देखील टीका केली आहे. भाजपने आपली संस्कृती दाखवली आहे. भाजपचे नेते आपल्या नेत्यांची मरणाची वाट पाहतात, असेही त्यांनी सांगितले.

Shital Mhatre : ‘दोघेही, एक ही थाली के चट्टे-बट्टे…’ म्हात्रेंचा राहुल गांधी आदित्य ठाकरेंवर निशाणा

तसेच राष्ट्रवादी काँग्रस आम्हाला ज्यादिवशी अधिकृतपणे विचारेल त्यादिवशी आम्ही सांगू की पुणे लोकसभा मतदारसंघामध्ये कुणाचे आमदार जास्त आहेत. पुणे लोकसभा मतदारसंघामध्ये कुणाचा आमदार आहे याची माहिती त्यांना योग्यवेळी देऊ, असे अरविंद शिंदे म्हणाले आहेत.

Tags

follow us