पदावर ताशेरे ओढले मग तुम्ही कायद्यात काय बदल केला? दीप्ती मगरच्या कुटुंबाचा चाकणकरांना सवाल

Rupali Chakankar मगर कुटुंबाच्या सांत्वन भेटीला चाकणकर गेल्या तेव्हा महिलांनी त्यांना चांगलेच धारेवर धरल्याचं पाहायला मिळालं.

Rupali Chakankar

Rupali Chakankar

Pune Crime Dipti Magar Suiside case victim family questiond to Rupali Chakankar, Chairperson of the State Women’s Commission : राज्यामध्ये पुण्यातील बहुचर्चित वैष्णवी हगवणे या कौटुंबिक हिंसाचाराची बळी ठरलेल्या महिलेल्या मृत्यूनंतर संपूर्ण राज्य हादरून गेले होते. त्यानंतर आता पुन्हा एक तशी घटना पुण्यातील उरळी कांचन परिसरात घडलेली आहे. हुंड्यासाठी होणाऱ्या शारीरीक आणि मानसिक त्रासाला कंटाळून महिलेने आत्महत्या केली आहे.

५० ब्राह्मण आमदारांची गुप्त बैठक आणि खलबतं: उत्तर प्रदेशात भाजपला धक्का? परंपरागत सवर्ण मतदार पक्षावर नाराज?

दीप्ती मगर असं या महिलेचं नाव असून तिचा विवाह रोहन चौधरी याच्याशी झाला होता. मात्र हुंडा, चारित्र्यावर संशय आणि दिसायला सुंदर नसण्याचे कारणं देत तिचा छळ करण्यात आला. त्यातून तिने आत्महत्या केली आहे. त्यानंतर आता पुन्हा राज्यमध्ये महिला आयोगाच्या कामावर प्रश्न उपस्थित केला जात आहे.

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात राडा, पोलिसांवर दगडफेक; नेमकं कारण काय?

दरम्यान जेव्हा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर मगर कुटुंबाच्या सांत्वन भेटीला चाकणकर गेल्या तेव्हा महिलांनी त्यांना चांगलेच धारेवर धरल्याचं पाहायला मिळालं.

विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदानाच्या VD14 ला मिळालं ‘राणा बाली’ टायटल, मायथ्री मूव्ही मेकर्सकडून अधिकृत घोषणा

यावेळी त्यांना सवाल करण्यात आला की, वैष्णवी हगवणे प्रकरणाला 7 महिने उलटून गेले आहेत. त्यानंतर आमची मुलगी तशाच प्रकरणात का ओढली गेली? तुमच्याही पदावर ताशेरे ओढले गेले. तुम्ही काय कायद्यात बदल केला? आज आमच्या मुलीचा बळी गेला तुम्ही काय कायद्यात बदल केले? प्रत्येक घरा-घरात वैष्णवीच्या वेळेस वाईट वाटल होतं पण तुम्ही काय कायद्यात बदले केले ? त्यावेळेस तुमच्याही पदावर आलं होतं. शिक्षा जर चांगली झाली तर कोणीही हिम्मत करणार नाही. शिक्षा होतं नाही म्हणून इतकं टॉर्चर केल जातं.

Exit mobile version