Kothrud Police Girl Torture Sassoon Hospital Report : कोथरुड पोलीस (Kothrud Police) ठाण्यात तिन्ही दलित मुलींना अमानुषपणे मारहाण आणि छळ केल्याचा आरोप करण्यात आला. त्यानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली होती. या प्रकरणात पोलिसांवर गुन्हा दाखल व्हावा, यासाठी पीडित मुली, राजकीय नेते आणि सामाजिक कार्यकर्ते थेट पुणे पोलीस आयुक्तालयात रविवारी (Pune Girl Torture Case) रात्री उशिरापर्यंत तळ ठोकून बसले होते. मात्र, पोलिसांकडून कोणतीही कारवाई करण्यात आली नव्हती. आता या प्रकरणात एक महत्त्वाचा तपशील पुढे आला आहे – ससून रुग्णालयाच्या वैद्यकीय अहवालात (Sassoon Hospital) मुलींच्या शरीरावर कोणतीही ताजी जखम आढळून आलेली नसल्याचं नमूद करण्यात आलं आहे.
कोथरुड पोलिसांना दिलासा?
ही वैद्यकीय माहिती कोथरुड पोलिसांसाठी मोठा दिलासा देणारी ठरू (Pune Crime) शकते. यामुळे पोलीस मारहाणीचे आरोप कमकुवत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ससून रुग्णालयात तपासणीसाठी गेलेल्या पीडित मुलींनी हा अहवाल स्वतःच्या प्रयत्नातून मिळवलेला असून, पोलिसांनी त्यांच्या वैद्यकीय चाचणीसंदर्भात कोणतीही पुढाकार घेतला नव्हता.
घटनाक्रम: नेमकं काय घडलं?
– 1 ऑगस्ट: या दिवशी संपूर्ण घटना घडली.
– दुपारी 2:30 वाजता: पोलीस पहिल्यांदा मुलींच्या घरी आले.
– 3 वाजता: पोलीस निघून गेले.
– 4:30 वाजता: पोलीस पुन्हा आले व तिन्ही मुलींना ठाण्यात घेऊन गेले.
– 4:30 ते 7:50: कोथरुड पोलीस ठाण्यात चार तासांहून अधिक वेळ त्या तिघींना बसवून ठेवण्यात आलं.
– मध्यरात्री 2 वाजता: या मुलींनी पोलिसांविरोधात तक्रार दाखल केली.
– 2 ऑगस्ट सकाळी: पीडित मुलींनी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.
– त्याचवेळी: वैद्यकीय तपासणीसाठी मागणी केली. मात्र, त्यांना तपासणीची यादीही देण्यात आली नाही.
– त्यानंतर: मुलींनी स्वतः निर्णय घेत ससून रुग्णालय गाठलं.
– 2 ऑगस्ट 5:40 वाजता: त्या ससूनला दाखल झाल्या.
– 6:30 वाजता: तपासणी सुरू झाली.
– त्यानंतर: अहवालात नमूद – शरीरावर 24 तासांतील कोणतीही ताजी जखम अथवा व्रण नाहीत.
मूळ प्रकरण काय?
छत्रपती संभाजीनगरमधील 23 वर्षीय विवाहित महिला पतीच्या मानसिक आणि शारीरिक त्रासाला कंटाळून पुण्यात आली होती. तिला मदत करणाऱ्या तीन तरुणींवरच पोलिसांनी लक्ष केंद्रित केलं. कोणतीही पूर्वसूचना न देता त्यांना थेट कोथरुड पोलीस ठाण्यात नेण्यात आलं. त्यानंतर त्यांच्यावर जातीवाचक शिवीगाळ, मारहाण आणि लैंगिक अपमानाचे गंभीर आरोप करण्यात आले. पीडित मुलींच्या म्हणण्यानुसार, सहायक पोलीस निरीक्षक प्रेमा पाटील, अमोल कामटे (संभाजीनगर पोलीस स्टेशन) आणि कॉन्स्टेबल संजीवनी शिंदे (संभाजीनगर) यांनी त्यांच्यावर शारीरिक आणि मानसिक छळ केला.
उद्धव ठाकरे अन् एकनाथ शिंदे एकाच दिवशी दिल्ली दौऱ्यावर; टायमिंग अन् नव्या समिकरणाची चर्चा
राजकीय आणि सामाजिक कार्यकर्त्यांचा दबाव
या घटनेनंतर अनेक सामाजिक संघटना, दलित हक्क कार्यकर्ते आणि राजकीय नेत्यांनी पुणे पोलीस आयुक्तालयासमोर धरणे आंदोलन केले. रात्री उशिरापर्यंत दबाव वाढत राहिला. मात्र, पोलिसांनी संबंधित अधिकार्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यास नकार दिला.