Mantra Insignia Directors Cheated 33.51 Crore : पुणे शहरातून एक धक्कादायक (Pune Crime) वृत्त समोर आलंय. नामांकित रिअल इस्टेट कंपनी मंत्रा इन्सिग्नियाच्या संचालकांनी तब्बल 33 कोटी 51 लाख रुपयांचा घोटाळा (Fraud) केला. पुण्यातील बांधकाम अन् गुंतवणूक क्षेत्रात एकच खळबळ उडाली. बनावट कागदपत्रे, खोट्या लेटरहेडचा वापर आणि करोडोंच्या (Mantra Insignia Directors Cheated) रकमेचा अपहार हे सर्व काही वर्षानुवर्षे सुरु होतं. अखेर आता या प्रकरणी मुंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल (Real Estate) करण्यात आला आहे.
या प्रकरणात रोहित गुप्ता, विशाल गुप्ता आणि सिद्धार्थ जैन या तिघा संचालकांविरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंदवण्यात आला असून, सध्या आर्थिक गुन्हे शाखेचे पथक तपासात व्यस्त आहे. बनावट दस्तऐवजांच्या आधारे करोडोंची रक्कम अडवण्यात आल्याची गंभीर तक्रार युगांक कदम यांनी पोलिसांकडे केली आहे.
पाँडिचेरी चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून सई ताम्हणकरला महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार
33 कोटी 51 लाख रुपयांची फसवणूक
पुणे शहरातील प्रसिद्ध बांधकाम कंपनी मंत्रा इन्सिग्नियाच्या संचालकांविरोधात तब्बल 33 कोटी 51 लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी मुंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. आर्थिक गुन्हे शाखा तपास करत आहे. याप्रकरणी रोहित घनश्याम गुप्ता (37, रा. हिमगिरी सोसायटी, सॅलिसबरी पार्क), विशाल नंदलाल गुप्ता (46, रा. पिटलेननगर, बिबवेवाडी) आणि सिद्धार्थ जैन (35, रा. एनआयबीएम रोड) यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. युगांक सुभाष कदम (34, रा. सेनापती बापट रोड) यांनी तक्रार दाखल केली आहे.
कबुतरांना दाणे टाकायचे असतील तर घराच्या टेरेसवर टाका; मनिषा कायंदेंनी आंदोलकांना ठणकावलं
तीन संचालकांविरोधात गुन्हा
तक्रारीनुसार, 27 जून 2019 ते 8 डिसेंबर 2023 दरम्यान, आरोपींनी तक्रारदाराच्या वडिलांच्या कंपनीच्या बनावट लेटरहेडवर खोटी कागदपत्रं तयार करून मंत्रा इन्सिग्निया प्रकल्पात आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप आहे. आरोपींनी सुरुवातीला 11,852 स्क्वेअर फूट बांधकामासाठी 4.88 कोटी रुपये देणे बाकी असूनही ते दिले नाहीत. त्यानंतर, 40 टक्के वाढीव एफएसआयच्या माध्यमातून 69,395 स्क्वेअर फूट जागेवर 4125 स्क्वेअर फूट बांधकाम करून त्यासाठी 28.62 कोटी रुपयांची रक्कमही न दिल्याचा आरोप आहे. त्यामुळे तक्रारदार यांना एकूण 33.51 कोटी रुपयांचा आर्थिक फटका बसला.
रिअल इस्टेट क्षेत्रात खळबळ
या प्रकरणी भारतीय दंड विधानाच्या कलम 420 (फसवणूक), 467 (बनावट कागदपत्र तयार करणे), 468, 471 आणि 34 नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सध्या आर्थिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय वाघमारे या प्रकरणाचा तपास करत आहेत. दरम्यान, मंत्रा प्रॉपर्टीज अँड डेव्हलपर्स प्रा. लि. ही पुण्यातील नामवंत रिअल इस्टेट कंपनी आहे. या आर्थिक गैरव्यवहारामुळे रिअल इस्टेट क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. पुढील तपासात आणखी धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता आहे.