Gautam Adani Fraud : यूएस न्याय विभागाने केलेले लाचखोरीचे आरोप अदानी समुहाने फेटाळले

  • Written By: Published:
Gautam Adani Fraud : यूएस न्याय विभागाने केलेले लाचखोरीचे आरोप अदानी समुहाने फेटाळले

Gautam Adani Fraud : अदानी समूहाचे सर्वेसर्वा गौतम अदान (Gautam Adani) यांच्यावर अमेरिकेच्या न्याय विभागाने भ्रष्टाचाराचे आरोप केलेत. याप्रकरणी अदानींविरुद्ध गुन्हाही दाखल करण्यात आला. यात खुद्द गौतम अदानी आणि त्यांचा पुतण्या सागर अदानी (Sagar Adani) यांच्यासह सात जणांचा सहभाग असल्याचा आरोप आहे. या सर्वांनी मिळून काही सरकारी अधिकाऱ्यांना सौरऊर्जा वितरणाचे कंत्राट मिळवून देण्यासाठी 2,019 कोटी रुपयांची लाच देऊ केल्याचं आरोपात म्हटलं. दरम्यान, या आरोपांवर अदानी समुहाने स्पष्टीकरण दिलं. अदानी समूहाने सर्व आरोप फेटाळून लावले असून ते निराधार असल्याचे म्हटले आहे.

अदानींवरील लाचखोरीच्या आरोपांनंतर शेअर बाजारात हाहाकार; शेअर कोसळले, 2 लाख कोटी पाण्यात 

अदानी समूहाने जारी केलेल्या स्पष्टीकरण निवेदनात भ्रष्टाचाराचे सर्व आरोप फेटाळले आहेत. अदानी ग्रीन्स’च्या संचालकांवर अमेरिकेच्या न्याय विभागाने केलेले सर्व आरोप बिनबुडाचे आहेत आणि आम्ही सर्व आरोप फेटाळून लावतो, असं या निवदेनात सुरूवातीलाच म्हटलं. अदानी समुहाने सांगितलं की, यूएस डिपार्टमेंट ऑफ जस्टिसने स्वतः सांगितल्याप्रमाणे, आरोपपत्रातील आरोप केवळ आरोप आहेत आणि दोषी सिद्ध होईपर्यंत गुंतलेले लोक निर्दोष मानले जातात. सर्व शक्य कायदेशीर उपाययोजना केल्या जातील, असं समुहाने म्हटलं आहे.

निकालापूर्वीच राजकीय खलबतं सुरू ; महाविकास आघाडीचे 2 बडे नेते अपक्ष अन् बंडखोरांच्या संपर्कात 

यासोबतच भागधारकांना आश्वासन देताना अदानी समूहाने नेहमीच्य सर्व क्षेत्रात पारदर्शकता आणि नियामक नियमांचे पालन केले आहे आणि ते यापुढेही करत राहील, असं निवेदनात म्हटलं.

आम्ही आमच्या समभागधारकांना, भागीदारांना आणि समूह कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना खात्री देतो की आम्ही सर्व कायद्यांचे पूर्णपणे पालन करणारी, कायद्याचे पालन करणारी संस्था आहोत. सर्व कायदेशीर उपाययोजना केल्या जातील. अदानी समूह आपल्या कामकाजात प्रशासन, पारदर्शकता आणि अनुपालनाची सर्वोच्च मानके राखण्यासाठी वचनबद्ध आहे, असंही निवेदनात म्हटलं.

लाचखोरीच्या आरोपानंतर अदानींचे मोठे पाऊल
कंपनीने म्हटले आहे की, युनायटेड स्टेट्स डिपार्टमेंट ऑफ जस्टिस आणि युनायटेड स्टेट्स सिक्युरिटीज अँड एक्सचेंज कमिशनने आमच्या बोर्ड सदस्य गौतम अदानी आणि सागर अदानी यांच्या विरोधात न्यूयॉर्कच्या पूर्व जिल्हा न्यायालयात फौजदारी आरोप आणि दिवाणी तक्रार दाखल केली आहे. या घडामोडी लक्षात घेता कंपनींनी समुहाच्या उपकंपनींनी प्रस्तावित USD नामांकित बाँड ऑफरिंगमध्ये तूर्तास पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube