Download App

Pune Rave Party : “आम्हाला माहिती मिळाली अन् आम्ही..”, खडसेंच्या आरोपांवर पोलीस आयुक्तांचं थेट उत्तर

पोलिसांवर होत (Pune Police) असलेले सर्व आरोप बिनबुडाचे आहेत. पोलिसांची कारवाई नियमानुसारच झाली आहे.

Amitesh Kumar on Pune Rave Party : पुणे पोलिसांनी खराडी भागातील एका रेव्ह पार्टीवर छापा (Pune Rave Party) टाकला. या पार्टीत माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या (Eknath Khadse) जावयाला अटक करण्यात आली. त्यामुळे मोठी खळबळ उडाली. जाणूनबुजून षडयंत्र करून खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर यांना यात अडकवण्यात आल्याचा आरोप केला जात आहे. न्यायालयातील युक्तिवादातही खेवलकरांच्या वकिलांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. यानंतर एकनाथ खडसे यांनी पोलिसांच्या कारवाईवर प्रश्न उपस्थित केले. पोलिसांना खासगी व्हिडिओ व्हायरल करण्याचा अधिकार कुणी दिला, असा सवाल खडसे यांनी केला.

दरम्यान, आता पुणे पोलीस आयुकित अमितेश कुमार यांनी (Amitesh Kumar) या सगळ्या घडामोडींवर भाष्य केलं आहे. पोलिसांवर होत (Pune Police) असलेले सर्व आरोप बिनबुडाचे आहेत. पोलिसांची कारवाई नियमानुसारच झाली आहे, असे अमितेश कुमार यांनी सांगितले. अमितेश कुमार यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. पोलिसांवर होत असलेले सगळे आरोप बिनबुडाचे आहेत. पोलिसांची कारवाई पारदर्शक आणि नियमानुसारच होईल. जी कारवाई झाली आहे त्याची विस्तृत माहिती प्रसारमाध्यमांना देण्यात आली आहे. पुणे पोलिसांच्या भूमिकेवर संशय घेण्याचं काहीच कारण नाही.

कुठल्याही प्रकाराचे फोटो व्हिडिओ पोलिसांकडून देण्यात आले नाहीत. लोक कोणी फोटोग्राफ किंवा व्हिडिओ काढत असतील तर त्यावर बंधन आम्ही घालू शकत नाही. पोलिसांची कारवाई माहितीवर आधारीत होती. आम्हाला गुप्त माहिती मिळाली होती आणि आम्ही कारवाई केली या कारवाईबाबत कुणीही मनात शंका घेऊ नका. कुणीही संशय घेऊ नका आम्ही कुठल्याही प्रकारचा फोटो लीक केला नाही. कोणताही व्हिडिओ किंवा इमेजेस पोलिसांकडून लिक करण्यात आले नाहीत अशी माहिती अमितेश कुमार यांनी दिली.

खराडी रेव्ह पार्टीत मोठा ट्विस्ट! आरोपींच्या घरात ड्रग्ज नाहीच, झडतीत फक्त डिजिटल पुरावे जप्त

तपासात उघड झाल्याप्रमाणे, या पार्टीसाठी व्हॉट्सॲप आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून नियोजन झालं होतं. पार्टीपूर्वी आरोपींनी एकमेकांशी सोशल मीडियाच्या चॅट्सद्वारे संवाद साधला होता. खराडीतील ‘बर्ड स्टे सूट’ येथे 25 ते 28 जुलैदरम्यान ही पार्टी आयोजित करण्यात आली होती. या ठिकाणी सात आरोपींपैकी दोन जण प्रत्यक्ष उपस्थित होते, अशी माहिती समोर आली आहे.

follow us