Download App

Sam David : बॉलिवूडचा मॉडेल बनला सायबर गुन्हेगार; सॅम उर्फ डेव्हिडचं इंटरनॅशनल टोळीशी कनेक्शन

बॉलिवूडमध्ये मॉडेल बनण्यासाठी आलेला सॅम उर्फ डेव्हिड सायबर गुन्हेगार निघाला असून त्याच आंतरराष्ट्रीय सायबर टोळीशी कनेक्शन असल्याचं उघड झालंय.

Sam David : चार वर्षांपूर्वी बॉलिवूडमध्ये मॉडेल बनण्यासाठी आलेला एक तरुण सायबर गुन्हेगार बनल्याचं समोर आलंय. पिंपरी चिंचवड सायबर पथकाने त्याला एका गुन्ह्यात अटक केली. त्याची चौकशी केली असता चौकशीअंती अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. सॅम उर्फ डेव्हिड (Sam David) असं त्याचं नाव असून त्याचा थेट आंतरराष्ट्रीय सायबर टोळीशी कनेक्शन असल्याचं उघड झालंय. त्याचा परदेशातील सायबर टोळीशीही संबंध असल्याचा दावा पिंपरी चिंचवड सायबर पोलिसांकडून करण्यात येत आहे.

हक्काच्या घराचं स्वप्न साकार! कोपरगावच्या इतिहासात पहिल्यांदाच 3220 घरकुले मंजूर…

मागील चार वर्षांपूर्वी सॅम ओडिसाहुन बॉलिवूडचा मॉडेल बनण्यासाठी आला. त्याचं मॉडेलिंगचा काम सुरु असतानाच तो क्रिप्टो करन्सीमध्ये ट्रेडिंग करीत असत. यासोबतच सायबर फ्रॉडसाठी हवे असलेल्या अकाऊंटच्या माध्यमातून तो चांगले पैसे कमवित असत. युजर्सकडून कमिशन बेसेसवर अकाऊंट घेण्यासाठी तो संपूर्ण भारताच्या वेगवेगळ्या भागात तो फिरत असतं. त्याने अनेकांचे अकाऊंट कमिशन बेसिसवर घेतले होता. सायबर फ्रॉडचे पैसे तो या अकाऊंटवरुन परदेशात ट्रान्सफर करीत असल्याचं समोर आलंय.

Video : तुमचं प्रेम कुणासमोर लाचार ठेवणार नाही; स्वार्थासाठी येणाऱ्या भाजपला ‘राज’ यांचा थेट संदेश

यासोबतच परदेशातील विविध टोळ्यांसोबत त्याचं कनेक्शन उघड झालंय. कंबोडिया टोळीसोबतही त्याचं कनेक्शन असू शकतं असा दावा पोलिसांकडून करण्यात केला जात आहे. परदेशातल्या सायबर टोळ्या फेक लिंक, अॅप तयार करुन पाठवतात. त्या ट्रेडिंग अॅपवर जे पैसे गुंतवले जातात ते पैसे या अकाऊंटवरुन ट्रान्सफर केले जात असत. त्यानंतर ते पैसे परदेशात पाठवले जायचे, अशी माहिती पोलिसांनी दिलीयं.

दरम्यान, सॅम पैसे जमा करुन घेण्यासाठी जे अकाऊंटस् लागतात ते अकाऊंट सॅम कमिशन बेसवर गोळा करीत होता. या प्रकरणी त्याच्याकडून 19 पेक्षा अधिक मोबाईल, जप्त केली असून इतरही 6 आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यातील 2 जण महाराष्ट्र, झारखंडमधून 2 तर गुजरातमधील 1 आरोपीला अटक केली आहे.

follow us