Download App

Pune : शरद पवारांसमोरच अजित पवारांची ‘दादागिरी’; भर बैठकीत चंद्रकांत पाटलांना धरलं धारेवर

पुणे : आमदारांचा निधी आणि थकविलेली बिल यावरुन पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांना विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी चांगलचं धारेवर धरलं. तीन-चार लाख लोकांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या आमदारांना निधीची कमतरता भासत आहे, बिलं रोखली जात आहेत. त्यामुळे मतदारसंघातील प्रश्न तडीस जात नसल्याचा मुद्दा अजित पवारांनी चंद्रकांत पाटील यांच्यासमोर उपस्थित केला. तसंच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करुन तातडीने हे प्रश्न सोडवावे अशी मागणी केली. (Bjp Chandrakant Patil

आज (१९ मे) पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वात पुणे जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली. या बैठकीला अजित पवार यांच्यासह खासदार सुप्रिया सुळे, खासदार अमोल कोल्हे,आमदार चेतन तुपे, आमदार सुनील टिंगरे, आमदार सुनील शेळके, आमदार दत्तात्रय भरणे, शिंदे गटाचे नेते माजी मंत्री विजय शिवतरे, भाजपचे नेते माजी मंत्री बाळा भेगडे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

कर्नाटक जिंकलं आता मध्य प्रदेश टार्गेट; ‘हा’ नेता करणार काँग्रेसचा इलेक्शन प्लॅन

बैठकीत काय झालं?

राज्यातील १ लाख ५ हजार कोटी रुपयांची बिलं थकलेली आहेत. यामध्ये पुणे जिल्ह्यातील बिलांचाही समावेश आहे. वरती विचारल्याशिवाय बिलं काढू नका, असे आदेश ट्रेझरीला आला आहे, असा गौप्यस्फोट यावेळी अजित पवार यांनी केला. ते पुढे म्हणाले, १ मार्चच्या आधी केलेल्या कामांची बिलं पेंडिंग आहे. त्यामुळे आम्ही चंद्रकांतदादांना मुंबईला गेल्यानंतर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्यासंदर्भात मागणी केली आहे. यासह पिण्याचं पाणी, कचरा, जलपर्णी, खड्डे, वीजेचे प्रश्न यासंबंधीच्या कामांसाठी निधीमध्ये वाढ करण्याची मागणी केल्याचंही त्यांनी सांगितलं.

राष्ट्रवादी सोडली, थेट मंत्री अन् आमदारांना नडल्या : आता चित्रा वाघ भाजपमध्ये एकट्या पडल्या?

बैठकीला शरद पवार यांची उपस्थिती :

दरम्यान, आजच्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही अनपेक्षितपणे उपस्थित राहिली. अनेक वर्षानंतर पवारांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठीकाल उपस्थिती दर्शविल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या. मात्र शरद पवार यांच्यासमोरही अजित पवार यांनी आमदारांच्या प्रश्नावरुन चंद्रकांत पाटील यांना धारेवर धरलं.

Tags

follow us