Download App

Pune Drugs : अधिकाऱ्यांकडून मंत्री शंभूराज देसाईंना हप्ता जातो; आमदार धंगेकरांचा गंभीर आरोप

पुण्यातील राज्य उत्पादन शुल्क अधिकारी मंत्री शंभूराज देसाई यांना हप्ते देत असल्याचा गंभीर आरोप आमदार रविंद्र धंगेकर यांनी केलायं.

Image Credit: Letsupp

Pune Drugs Matter : पुण्यातील राज्य उत्पादन शुल्क अधिकारी मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांना हप्ते देत असल्याचा गंभीर आरोप आमदार रविंद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी केलायं. दरम्यान, पुण्यातील एफसी रोड (Pune FC Road) परिसरातील एका नामंकित हॉटेलमध्ये पार्टीत तरुण ड्रग्ज घेत असल्याचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झालायं. ललित पाटील प्रकरण ते पुणे पोर्शे कार प्रकरणी पुण्यातील ड्रग्ज प्रकरण आणि पब, बार हॉटेलवर कारवाई करण्याची मागणी सातत्याने केली जात होती. अशातच आता ड्रग्ज घेतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने आमदार धंगेकर यांनी पुन्हा एकदा पोलिस प्रशासनासह, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी आणि मंत्री शंभूराज देसाई यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

‘या’ मालिकेच्या सहाय्यक दिग्दर्शकांचं अपघाती निधन; दहा दिवसांनंतर मृत्यूशी झुंज अपयशी

रविंद्र धंगेकर म्हणाले, पुण्यातील ड्रग्ज विक्री प्रकरणी मी सातत्याने पोलिस खात्याला पत्रव्यवहार करत आहे. मात्र, काही कीडलेल्या अधिकाऱ्यांमुळेच पुण्यात हे धंदे फोफावले जात आहेत. पोलिसांसह उत्पादन शुल्क विभागाला पैसे देऊन हे हॉटेल कारवाई होऊनही पुन्हा सुरु केले जात आहेत. पब, हॉटेलचालकांना कसलीच भीती राहिलेली नसून त्यांच्यासाठी कडक कायदा पारित करण्याची गरज आहे. कायदा आहे पण पोलिस वापरत नाहीत, ते हप्ते घेत आहेत, ही पुण्याला ही मोठी कीड लागली असल्याचा संताप धंगेकरांनी व्यक्त केलायं.

रोज 20 लाख लोक टँकरची वाट पाहतात; मराठवाड्यातील पाणीटंचाई कधी संपणार? वाचा आकडेवारी

तसेच ललित पाटील प्रकरणी पोलिसांची बदनामी झाली तरीदेखील पोलिस सुधरत नाहीत. राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांचं नाव चुकून देसाई आहे, त्यांचं नाव कसाई हवं होतं. आम्ही त्यांच्यावर आरोप केले तेव्हा ते हक्कभंग आणतो म्हणाले होते, पण त्यांनी माझ्यावर नाही तर पोलिसांवर हक्कभंग आणला पाहिजे, राजपूत नावाच्या पोलिस अधिकाऱ्याला महिन्याला 3 कोटी रुपये हप्ता मिळत आहे. हे पैसे मंत्र्यांपर्यंत पोहोचवले जातात. शंभूराज देसाईंनाही हप्ता जातो, त्यामुळेच हे धंदे सुरु आहेत. मंत्र्याची घरे चालवण्याचं काम राजपूतसारखा अधिकारी करीत आहे, यांच्यामुळे तरुणाई उद्धवस्त होत असल्याचा गंभीर आरोप धंगेकरांनी केलायं.

मंत्री देसाईंनी तत्काळ राजीनामा द्यावा…
मागील 8 ते 9 महिन्यांपासून आम्ही पुण्यातील ड्रग्ज प्रकरणी भूमिका मांडत आहोत. पुण्यात जेव्हा कोट्यावधींचे ड्रग्जचे साठे आढळून आले तेव्हा आम्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री शंभूराज देसाई यांना सवाल केले. त्यावर त्यांनी अरेरावीची भाषा केली होती. त्यांनी हप्ते घेण्याचं ठरवलं असून त्यांच्यामुळेच पुण्यातली तरुणाई उद्धवस्त होत आहे. त्यामुळे आता शंभूराज देसाई यांनी तत्काळ राजीनामा दिला पाहिजे, आणि राज्य उत्पादन शुल्कचे अधिकारी राजपूत यांचं निलंबन झालं पाहिजे, त्याशिवाय पुणे सुधारणार नसल्याचं सुषमा अंधारे यांनी स्पष्ट केलंय.

follow us

वेब स्टोरीज