‘या’ मालिकेच्या सहाय्यक दिग्दर्शकांचं अपघाती निधन; दहा दिवसांनंतर मृत्यूशी झुंज अपयशी

‘या’ मालिकेच्या सहाय्यक दिग्दर्शकांचं अपघाती निधन; दहा दिवसांनंतर मृत्यूशी झुंज अपयशी

Marathi Serial Assistant Directors death after Accident : सोनी मराठी या वाहिनीवरील ‘कारण गुन्ह्याला माफी नाही’ (Marathi Serial) लोकप्रिय मालिकेतून एक दुःखद बातमी समोर आली आहे. या मालिकेचे सहाय्यक दिग्दर्शक (Assistant Director) असलेले गौरव काशिदे यांची मृत्यूची झुंज अखेर अपयशी ठरली आहे. गेले काही दिवसांपूर्वी त्यांचा अपघात झाला होता. त्यानंतर त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र आज अखेर त्यांचे प्राणज्योत मालवली.

जे शिक्षकच नाहीत त्यांना शिक्षकांचे प्रश्न काय समजणार?, भाऊसाहेब कचरेंचा विवेक कोल्हेंवर हल्लाबोल

त्यांच्या जाण्यामुळे मराठी कला विश्वात शोभकाळा पसरली आहे. तसेच त्यांचे निधनाची पोस्ट पाहून अनेकांना धक्का बसला असून अनेक कलाकारांनी त्यांना श्रद्धांजली वाहिले आहे. याबाबत मालिकेची निर्माती आणि अभिनेत्री मनवा नाईक हिने सोशल मीडियावर एक भाऊ पोस्ट शेअर केली. यामध्ये गौरवचा फोटो शेअर करत मनवाने लिहिलं आहे की, एक तरुण मेहनती मुलगा जो ‘तुमची मुलगी काय करते’ या मालिकेतून आमच्याशी जोडला गेला.

भाजप कागदावर पण, मित्रपक्षाचा अ‍ॅक्शन मोड; पराभवानंतर दोन राज्यातील कार्यकारिणीच बरखास्त

View this post on Instagram

A post shared by Manava Arun Naik (@manava.naik)

तर ‘कारण गुन्ह्याला माफी नाही’ या मालिकेत त्याने सहायक दिग्दर्शक म्हणून काम पाहिलं. केवळ 26 वर्षांचा असलेला गौरव हा त्याच्या कुटुंबाचा आधारस्तंभ होता. 10 जूनला त्याच्या वाढदिवसाच्या आदल्या दिवशी आम्ही सेलिब्रेशन केलं. त्यावेळी पावसात रस्त्यावरून जात असताना गौरवणे नेसर वाकोला पुलावर एका खाजगी बसला धडक दिली. ज्यामध्ये तो गंभीर दुखापतग्रस्त झाला. त्याच्यावर मेंदूची शस्त्रक्रिया झाली. मात्र अखेर त्याची मृत्यूची झुंज अपयशी ठरली आहे. असं म्हणत मनवाने ही भावूक पोस्ट शेअर केली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज