Download App

पुण्यात “EDUCONTECH-25” राज्यस्तरीय परिषदेचे आयोजन, शैक्षणिक क्षेत्रातील व्यवसायाला नवे वळण देणारा उपक्रम : दीपक बगाडे

“EDUCONTECH-25” ही राज्यस्तरीय परिषद येत्या 12 सप्टेंबर 2025 रोजी अजिंक्य डीवाय पाटील विद्यापीठ येथे आयोजित करण्यात आली आहे.

Pune News : शिक्षण आणि तंत्रज्ञानाचा संगम हा आजच्या जागतिक व्यवसाय क्षेत्रातील क्रांतीचा केंद्रबिंदू ठरत आहे. याच धर्तीवर “EDUCONTECH-25” ही राज्यस्तरीय परिषद येत्या 12 सप्टेंबर 2025 रोजी अजिंक्य डीवाय पाटील विद्यापीठ, पुणे येथे आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेचे वैशिष्ट्य म्हणजे शैक्षणिक उद्योजक व व्यावसायिकांसाठी ती ‘गेमचेंजर’ ठरणार आहे. क्रीपॉन एड्युटेक प्रा. लि. या कंपनीचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक बगाडे आणि विद्यापीठाचे कुलगुरू राकेशकुमार जैन यांचे या परिषदेला मोलाचे सहकार्य लाभले आहे. शैक्षणिक क्षेत्रातील नवनवीन नवकल्पना व तंत्रज्ञानाच्या आधारे विकास साधण्यास हा उपक्रम दिशा देणार आहे.

या परिषदेतील मुख्य आकर्षण म्हणजे (Pune News) राज्यभरातील 150 पेक्षा जास्त कोचिंग क्लास चालक, शैक्षणिक संस्था, तंत्रज्ञान कंपन्या यांचा सहभाग. या परिषदेच्या माध्यमातून सुमारे 300 पेक्षा जास्त व्यवसायिक भागीदाऱ्या व सामंजस्य करार (MOU) होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. परिणामी शैक्षणिक उद्योजकतेसाठी एक नवीन परिसंस्था तयार होणार आहे.

या परिषदेला लेखक अच्युत गोडबोले, उद्योजक नरेंद्र फिरोदिया, एमकेसीएलचे संचालक विवेक सावंत, उद्योजक भगवान गवई, लेखक किरण देसले, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रो. रवी आहुजा, प्रियदर्शनी ग्रुप ऑफ स्कूलचे संचालक डॉ. राजेंद्र सिंग, निराली पब्लिकेशनच्या जिग्नेश फुरिया आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

स्वच्छ वायू सर्व्हेक्षणात देशात अमरावतीची बाजी; पुणेकरांचा श्वास मोकळा 23 हून दहाव्या क्रमांकावर

परिषदेतील ठळक मुद्दे :

कमी भांडवलात शैक्षणिक व्यवसाय मोठ्या प्रमाणात कसा वाढवता येईल याविषयी मार्गदर्शन.

डिजिटल उपायांमुळे पारंपरिक शिक्षण पद्धतीत होणारे बदल आणि यशस्वी उदाहरणे.

20 पेक्षा अधिक कनिष्ठ महाविद्यालयांचे प्राचार्य व संचालक यांची उपस्थिती, ज्यामुळे संस्थात्मक भागीदाऱ्या सुलभ होतील.

नवउद्योजकांसाठी स्वतंत्र सत्र, ज्यात शिक्षण, कंटेंट व तंत्रज्ञान क्षेत्रातील संधींवर चर्चा.

परिषदेच्या निमित्ताने “महाराष्ट्र एज्युकेशन आयकॉन लीडरशिप अवॉर्ड”, “डिजिटल लीडरशिप इन एज्युकेशन अवॉर्ड” यांसारखी विविध पुरस्कार श्रेणी जाहीर करण्यात येणार आहेत. हे पुरस्कार कंपन्यांच्या विश्वासार्हतेत व बाजारपेठेतील उपस्थितीत भर टाकणार असून थेट विद्यार्थ्यांच्या प्रवेशसंख्येत व व्यावसायिक करारांत वाढ घडवून आणतील.राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) या संदर्भात परिषदेतील चर्चेला विशेष महत्त्व असेल.

“EDUCONTECH-25” ही केवळ परिषद नसून महाराष्ट्रातील शैक्षणिक व्यवसायाला गती देणारी महत्त्वाची परिषद ठरणार आहे. अधिक माहितीसाठी educontech.com या संकेतस्थळावर किंवा ९६६५०१४७०० / ९६६५०१४६०० या क्रमांकावर संपर्क साधता येईल.

मोठी बातमी! पुणे जिल्ह्यात तीन नवीन महापालिका होणार, अजित पवारांनी काय सांगितलं?

follow us