पुणे : गेल्या दहा दिवसांपासून सुरू असलेल्या गणपती उत्सावाची सांगता काल (दि. 28) गणपती विसर्जनाने झाली. मात्र, दरवर्षीप्रमाणे पुण्यातील गणपती विसर्जन मिरवणूक यंदाही चर्चेचा विषय ठरली. यामागे कारण ठरले ते दगडुशेठ गणपतीचे (Dagdushet Ganpati) ठरलेल्या वेळेत झालेले विसर्जन. परंतु, दगडुशेठ मंडळाच्या गणपतीचे विसर्जन वेळेत होऊनही शहरातील मंडई, बाबू गेनू, श्रीमंत भाऊ रंगारी यासह अन्य मंडळांच्या मिरवणूक उशिरा शुरू झाल्याने यंदा वेळेत मिरवणूक संपवण्याचा अंदाज साफ चुकल्याची चर्चा आता सुरू झाली आहे. तर, विक्रमी वेळेत आणि दिलेला शब्द पाळल्यामुळे लाखो पुणेकरांचं मनं जिंकण्यात दगडुशेठ मंडळाने बाजी मारली आहे. यावर्षी दगडुशेठ मंडळाने विसर्जनादिवशी दुपारी चार वाजता मिरवणुकीत सहभागी होत रात्री 9 च्या सुमारास मिरवणूक संपवली. (Pune Ganpati Visarjan Miravnuk Update)
दगडुशेठची मिरवणूक वेळेपूर्वी संपल्याने यंदा विसर्जन मिरवणूक लवकर संपेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मात्र, शहरातील मंडई, बाबू गेनू, श्रीमंत भाऊ रंगारी यासह अन्य मंडळांच्या मिरवणूक उशिरा शुरू झाली आणि वेळेत मिरवणूक संपवण्याचा अंदाज चुकाला. हे वृत्त लिहित असेपर्यंत पुण्यातील विसर्जन मिरवणूक संपल्याचे अद्यापपर्यंत प्रशासनाकडून जाहीर करण्यात आलेले नाही. त्यामुळे यंदाही पुण्यातील विसर्जन मिरवणूक संपण्यास दुपार उजाडणार आहे.
गतवर्षी पुण्यातील विसर्जन मिरवणूक जवळपास 30 तास चालली होती. दरवर्षी होणारा विलंब आणि नागरिकांसह प्रशासनावर पडणारा ताण या गोष्टी टाळण्यासाठी पोलीस आणि गणेश मंडळांमध्ये बैठकीत सर्व गोष्टी नियोजनाप्रमाणे करण्याचा शब्द देण्यात आला होता. मात्र, यात बाजी मारली ती दगडुशेठ मंडळाने.
Sharad Pawar : रोहित पवारांच्या कंपनीवर कारवाई; शरद पवार म्हणाले, मी उत्तर..
शब्द पाळत दगडुशेठ मंडळाने जिंकली सर्वांची मने
दरवर्षी दगडुशेठ मंडळाचा गणपती विसर्जन मिरवणुकीत मध्यरात्रीच्या सुमारास लागत असे. मात्र, गेल्या वर्षी झालेला विलंब लक्षात घेता यावर्षी मंडळाकडून विसर्जनाच्या दिवशी गणपती चार वाजता लागेल असे जाहीर करण्यात आले. अनेकांनी यावर असे होणे शक्य नाही. हे नियोजन प्रत्यक्षात उतरवणे शक्य नसल्याचा दावा केला. मात्र, मंडळाने दिलेला शब्द खरा करून दाखवला. एरवी विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी साडेसहा ते सातच्या सुमारास अलका चौकात येणारा दगडुशेठचा गणपती यंदा मात्र, रात्री आठच्या सुमारासच अलका चौकात दाखल झाला. त्यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला तर, मंडळाने दिलेला शब्द पाळल्यामुळे लाखो पुणेकरांची मने जिंकण्यात मंडळाने बाजी मारल्याची चर्चा शहरभर सुरू आहे.
दुसरीकडे, जरी दगडुशेठने दिलेल्या ग्वाहीप्रमाणे वेळेत विसर्जन मिरवणूक संपवली असली तरी, त्यानंतर येणाऱ्या अखिल मंडई, बाबू गेनू, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी, राजाराम आदी मंडळांची मिरवणूक उशिराने सुरू झाली. त्यामुळे विसर्जनाला विलंब झाला. तर, दगडूशेठनंतर ठरलेल्या मंडळांऐवजी अन्य मंडळांच्या रथांना परवानगी देण्यात आल्याने मंडळांमध्ये अंतर्गत स्पर्धा रंगल्याच्या चर्चेने आता जोर धरला आहे.
Sanjay Raut : इथे लोकशाहीची हत्या अन् ‘घाना’ मध्ये लोकशाहीवर प्रवचन; राऊतांचा नार्वेकरांचा टोला
मानाच्या गणपतींचे विसर्जन कधी झाले
पुण्यातील मानाच्या पाच गणपतींच्या विसर्जन मिरवणुकीला गुरूवारी (दि.28) सकाळी 10 वाजण्याच्यासुमारास उत्साहात सुरूवात झाली. त्यानंतर लक्ष्मी रोडवर लाखो भाविकांनी आनंदाने गणपती बाप्पांचे स्वागत केले. त्यानंतर मानाचा पहिला गणपीत कसबा गणपतीचे दुपारी 4.35 वाजण्याच्या सुमारासा विसर्जन करण्यात आले. मानाचा दुसऱ्या तांबडी जोगेश्वरी गणपतीची मिरवणूक सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास सुरू झाली आणि संध्याकाळी 5 वाजून 10 मिनिटांच्या सुमारास या मंडळ्च्या गणपतीचे विसर्जन करण्यात आले. मानाच्या तिसऱ्या गुरुजी तालीम गणपतीचे विसर्जन संध्याकाळी 5.55 वाजता करण्यात आले. मानाचा चौथा तुळशीबाग गणपतीचे विसर्जन सायंकळी 6.32 वाजता तर, पाचवा मानाचा गणपती केसरीवाडा गणपतीचे विसर्जन सायंकाळी पावणे सातच्या सुमारास पूर्ण झाले.