Sharad Pawar : रोहित पवारांच्या कंपनीवर कारवाई; शरद पवार म्हणाले, मी उत्तर..
Sharad Pawar : राष्ट्रवादी (शरद पवार) गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्या बारामती ॲग्रो या कंपनीवर राज्य सरकारकडून कारवाई करण्यात आली. मध्यरात्री दोन वाजता महाराष्ट्र प्रदूषण विभागाने नोटीस देत 72 तासांत दोन प्लांट बंद करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. स्वतः रोहित पवार यांनी या कारवाईबाबत ट्विट करुन माहिती देत दोन मोठ्या नेत्यांच्या सांगण्यावरुन ही कारवाई करण्यात आल्याचा आरोप केला होता. या घडामोडींनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी या कारवाईवर प्रतिक्रिया दिली आहे.
पवार यांनी आज गोविंद बाग येथील त्यांच्या निवासस्थानी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी पत्रकारांनी त्यांना रोहित पवार यांच्या कंपनीवरील कारवाईबाबत प्रश्न विचारला. त्यावर पवार म्हणाले, यावर मी उत्तर देणार नाही. इंडिया आघाडीत वाद होणार नाही याची काळजी आम्ही घेऊ अस मोजकेच उत्तर देत ठोस मात्र काहीच सांगितले नाही.
Baramati Agro : कारवाईचे निर्देश देणार ‘ते’ दोन बडे नेते कोण? रोहित पवारांच्या आरोपांनी खळबळ
अजितदादा अन् भाजपला विरोध केल्यानेच कारवाई
केवळ आणि केवळ सूडबुद्धीने रोहित पवारांच्या कंपनीवर कारवाई करण्यात आली. रोहित पवार हे सातत्याने भाजप आणि अजितदादा गटाला विरोध करत असल्यानेच ही कारवाई केली, असा आरोप तपासे यांनी केला. रोहित पवार यांच्यावर ही कारवाई सूडबुद्धीनेच केली गेली आहे. रोहित पवारांचा दोष इतकाच आहे की आजोबांची काठी पकडून ते महाराष्ट्रात आणि देशात भाजपाच्या राजकारणाला विरोध करत आहेत. शरद पवारांच्या विचारांना जे सोडून गेले, त्यांना रोहित पवार विरोध करत आहेत. त्यामुळेच राज्य सरकारच्या विभागाने ही कारवाई केली, असा आरोप तपासे यांनी केला होता.
रोहित पवार काय म्हणाले होते ?
राज्यातील दोन मोठ्या नेत्यांच्या सांगण्यावरून कुठला तरी द्वेष मनात ठेवून आज पहाटे दोन वाजता राज्य शासनाच्या एका शासकीय विभागाच्या माध्यमातून माझ्या कंपनीच्या एका विभागावर कारवाई करण्यात आली. युवा मित्रांना एकच सांगू इच्छितो की, संघर्ष करतांना भूमिका घेताना अनेक अडचणींचा सामना करावाच लागतो. मी बोलतो, ठोस भूमिका घेतो म्हणून मला अडचणीत आणण्यासाठी आता प्रयत्न सुरू झाले आहेत, परंतु अडचणी आल्या म्हणून संघर्ष थांबवायचा नसतो अशी प्रतिक्रिया आमदार रोहित पवार यांनी या कारवाईवर दिली होती.
Rohit Pawar यांच्या कंपनीवर कारवाई का केली ? शरद पवार गटाचा भाजप अन् अजितदादांकडे रोख