शिक्षणक्षेत्र हादरलं! Garware Collage मध्ये शिक्षक भरती घोटाळा

Garware Collage :  पुणे येथील कर्वे रोडवर असलेल्या आबासाहेब गरवारे कॉलेजमध्ये शिक्षक भरती घोटाळ्या संदर्भात महत्वाची बातमी समोर आली आहे. आबासाहेब गरवारे कॉलेजमधील शिक्षक भरती घोटाळ्याची चौकशी आता थेट न्यायालयाच्या नियंत्रणाखाली केली जाणार आहे. 18 शिक्षकांची बॅक डेटेड नियुक्ती केल्याप्रकरणी न्यायालयाने या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. शासनाने शिक्षक भरतीवर बंदी घातलेली असतानादेखील बॅक डेटेड […]

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 04 29T130747.522

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out 2023 04 29T130747.522

Garware Collage :  पुणे येथील कर्वे रोडवर असलेल्या आबासाहेब गरवारे कॉलेजमध्ये शिक्षक भरती घोटाळ्या संदर्भात महत्वाची बातमी समोर आली आहे. आबासाहेब गरवारे कॉलेजमधील शिक्षक भरती घोटाळ्याची चौकशी आता थेट न्यायालयाच्या नियंत्रणाखाली केली जाणार आहे.

18 शिक्षकांची बॅक डेटेड नियुक्ती केल्याप्रकरणी न्यायालयाने या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. शासनाने शिक्षक भरतीवर बंदी घातलेली असतानादेखील बॅक डेटेड नियुक्त्या दाखवून शिक्षकांची भरती करण्यात आली होती. तसेच या प्रकरणात कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी तत्कालीन शिक्षण उपसंचालकांसह कॉलेजमधील प्राचार्य, उपप्राचार्य व शिक्षकांविरोधात एका महिलेने पोलिस तक्रार केली आहे.

Maharashtra APMC Election Result LIVE updates : राज्याच्या कल कोणाकडे? कोण राखणार सत्ता

या प्रकरणामध्ये न्यायालयाने चौकशीचे आदेश दिले आहेत व पोलिसांना दोन महिन्यांमध्ये चौकशी अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.आबासाहेब गरवारे महाविद्यालयातील शिक्षक भरती घोटाळ्याप्रकरणी मेहेर नंदन निरगुंदीकर यांनी पोलिसांकडे व न्यायालयात तक्रार दिली होती.

पारनेरमध्ये Sujay Vikhe गटाचा धुव्वा, लंके-औटी गटाने सर्व जागा जिंकल्या

निरगुंदीकर यांनी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी ,आबासाहेब गरवारे, महाविद्यालय शिक्षक किरण खाजेकर, प्राचार्य पी.बी. बुचडे, तत्कालीन लिपिक, अविनाश गोरे, उपप्राचार्य मोहिनी कुलकर्णी, संस्थेचे आजीव सदस्य गोविंद कुलकर्णी , सहसचिव सुधीर गाडे यांच्यासह तब्बल २९ जणांविरोधात तक्रार दिली होती. गुरुवारी न्यायालयाने याबाबत आदेश दिला असून दोन महिन्यांमध्ये या संदर्भातील तपास करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याला चौकशी अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत

Exit mobile version