Download App

Pune Car Accident : वेदांत, विशाल अन् आता आजोबा; अख्ख अग्रवाल कुटुंब चौकशीच्या फेऱ्यात

Pune Hit And Run Case : दारूच्या नशेत भरधाव कारने दोघांना चिरडणारा अल्पवयीन बिल्डरपुत्र प्रकरणात आता एक मोठी बातमी समोर आली आहे.

Pune Hit And Run Case : दारूच्या नशेत भरधाव कारने दोघांना चिरडणारा अल्पवयीन बिल्डरपुत्र (Pune Hit And Run Case) प्रकरणात आता एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार एका जुन्या प्रकरणात अल्पवयीन आरोपीच्या आजोबांना चौकशीसाठी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या कार्यालयात आणण्यात आले आहे. माहितीनुसार, सध्या त्यांची कसून चौकशी करण्यात येत आहे. यामुळे अख्ख अग्रवाल कुटुंब चौकशीच्या फेऱ्यात सापडले आहे.

हिट अँड रन प्रकरणाच्या तपासादरम्यान अग्रवाल कुटुंबाचे छोटा राजनशी संबंध असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. त्यामुळे या प्रकरणाची गंभीर दखल घेत पुणे गुन्हे शाखेने वेदांतचे आजोबा सुरेंद्र अग्रवाल (Surendra Agarwal) यांची पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या कार्यालयात चौकशी सुरू केली आहे. मात्र या चौकीशीनंतर  सुरेंद्र अग्रवाल यांना अटक होणार का? याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

माहितीनुसार, 2007 आणि 2008 मध्ये भावाशी संपत्तीवरून वाद असल्याने सुरेंद्र अग्रवाल यांनी बँकाकला जाऊन छोटा राजनची भेट घेतली होती आणि त्यानंतर शिवसेनेचे नेते अजय भोसले यांच्या हत्येची सुपारी छोटा राजनला दिली होती. या प्रकरणात त्यांच्यावर एफआयआर देखील दाखल करण्यात आली होती मात्र पोलिसांनी या प्रकरणात मकोकाच्या अंतर्गत एफआयआर दाखल न करता विविध कलमांतर्गत एफआयआर दाखल केल्याने पोलिसांच्या कामकाजावर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. मात्र आता पुन्हा एकदा या प्रकरणात  सुरेंद्र अग्रवाल यांची चौकशी सुरु करण्यात आली आहे.

तर दुसरीकडे 19 मेच्या पहाटे वेदांत अग्रवालने दारूच्या नशेत वेगात पोर्शे कार चालवत दोन जणांना चिरडले होते. या प्रकरणात आरोपीला अटक करण्यात आली होती मात्र त्याला दुसऱ्या दिवशी जामीन मिळाला होता. तर  मुलगा अल्पवयीन असताना गाडी चालवायला दिल्याने पोलिसांनी  आरोपी अल्पवयीन मुलाच्या वडिलांवर गुन्हा दाखल करून अटक केली आहे.

बजेट तयार ठेवा, टाटा करणार मोठा धमाका, लाँच होणार ‘ह्या’ 4 शानदार इलेक्ट्रिक SUV कार्स

वडील विशाल अग्रवालला 24 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून, विशाल अग्रवालने अल्पवयीन वेदांतला गाडी देऊन चूक केल्याची कबुली दिली आहे. पोलीसी चौकशीदरम्यान विशाल अग्रवाल यांनी ही कबुली दिल्याचे सांगितले जात आहे.

follow us