पुणे पोर्श हिट अँड रन प्रकरण, ‘त्या’ अधिकाऱ्यांना धक्का, पोलीस दलातून होणार बडतर्फ

पुणे पोर्श हिट अँड रन प्रकरण, ‘त्या’ अधिकाऱ्यांना धक्का, पोलीस दलातून होणार बडतर्फ

Pune Porsche Case :  पुण्यातील कल्याणीनगर परिसरात गेल्यावर्षी झालेल्या हिट अँड रन प्रकरणामुळे (Porsche Hit And Run Case) संपूर्ण राज्यात संतापाची लाट पसरली होती. या प्रकरणात एका अल्पवयीन मुलाने पोर्श कारने रस्त्यावरून चाललेल्या तरुण आणि तरुणीला धडक दिली होती ज्यामुळे दोघांचा जागीच मृत्यू झाला होता. तर आता या प्रकरणात एक मोठी बातमी समोर आली आहे.

या बातमीनुसार या प्रकरणात निलंबित पोलीस अधिकाऱ्यांना पोलीस दलातून बडतर्फ करण्याचा प्रस्ताव राज्याच्या पोलीस महासंचालकांकडे पाठवण्यात आला आहे. या हिट अँड रण प्रकरणात न्यायलयाने अल्पवयीन मुलाला निबंध लिहिण्याची शिक्षा दिली होती मात्र त्यानंतर या प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे झाल्याने या प्रकरणाची चर्चा संपूर्ण देशात सुरु झाली होती. तर आता या प्रकरणात पुणे पोलिसांनी मोठा निर्णय घेत दोन अधिकाऱ्यांना पोलीस दलातून बडतर्फ करण्याचा राज्याच्या पोलीस महासंचालकांकडे पाठविला आहे.

या प्रकरणात तपास करताना दोन पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले होते. तसेच त्यांची चौकशी देखील सुरु करण्यात आली होती. आता त्यांची चौकशी पूर्ण झाली असून कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवून राहुल जगदाळे (Rahul Jagdale) आणि विश्वनाथ तोडकरी (Vishwanath Todkari) यांना पोलीस दलातून बडतर्फ करण्याचा प्रस्ताव पुणे पोलिसांनी राज्याच्या पोलीस महासंचालकांकडे पाठवले असल्याची माहिती पोलीस आयुक्त अमितेशकुमार (Amitesh Kumar) यांनी दिली.

इंग्लंडला धक्का देण्याची तयारी, टीम इंडिया घेणार मोठा निर्णय, संघात एंट्री करणार ‘हा’ स्टार खेळाडू

24 मे 2024 रोजी या प्रकरणाचा तपास करताना पोलीस अधिकारी राहुल जगदाळे आणि विश्वनाथ तोडकरी यांच्यावर कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवून पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी निलंबित केले होते. त्यांची विभागीय चौकशी सुरू होती आणि या चौकशीत दोन्ही अधिकारी दोषी आढळ्याने त्यांना पोलीस खात्यातुन बडतर्फ करण्यात यावा असा प्रस्ताव पोलीस महासंचालकांना पाठविण्यात आला असल्याची माहिती अमितेशकुमार यांनी दिली.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube