ससूनचे अधिष्ठाता डॉ. विनायक काळे सक्तीच्या रजेवर; विरोधी पक्षनेते वडेट्टीवार भडकले
Vadettiwar on Pune accident : पुण्यातील कल्याणीनगर येथील (Hit and run) हिट अँड रन प्रकरणी ससून रुग्णालयाचे (Vinayak Kale )अधिष्ठाता डॉ. विनायक काळे यांच्यावर कारवाई करत त्यांना तत्काळ सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं आहे. (Pune accident) तसंच त्यांच्या जागी बारामती येथील अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत म्हस्के यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे.
Pune Sasoon Hospital : पुण्यात धमकी, फेक कॉलचे सत्र संपेना! आता अधिकाऱ्यांना धमकी!
विजय वडेट्टीवार म्हणाले, सडलेले आंबे बाहेर फेकायला पाहिजेत. मात्र, आत्ता आंब्याचं टोपलच बाहेर फेकायचं काम केलं जातं आहे. काळे हे मॅटमध्ये जाऊन ते बदली विरोधात लढले. आत्ता ही ऐतीची संधी मिळाली आहे की, पैसे घेऊन मर्जीतीला माणूस बसवाला आणि त्याचा फायदा ते घेत आहेत. ससूनच्या डीनला आत्ताच्या परिस्थिती सक्तीच्या रजेवर पाठवणं गरजेचं होत का? तर ते नव्हतं. कारण, त्या प्रकरणात ते थेट जबाबदार दिसत नसल्याचं वडेट्टीवार म्हणाले आहेत.
वडेट्टीवार चांगलेच भडकले होते. ते म्हणाले, शासनाकडून डॉ. अजय तावरे यांचं निलंबन करण्यात आलं. मात्र, निलंबन नव्हे तर अशा अधिकाऱ्याला फासावर चढवलं पाहिजे. तसंच पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याबाबत बोलताना वडेट्टीवार म्हणाले, पुणेकर नागरिकांनी जी मागणी केली आहे ती रास्त असून ज्या पद्धतीने त्यांनी हे प्रकरण हाताळलं त्यामधून त्यांच दुर्लक्ष दिसत आहे. ते जिथे जिथे गेले आहे तिथे तिथे वादग्रस्त ठरले आहेत. त्यामुळं त्यांच्या बदलीची मागणी जर पुणेकर करत असतील तर ती योग्य आहे असंही वडेट्टीवार म्हणाले आहेत.
Video : कल्याणीनगर अपघात प्रकरण कुणी दाबलं?; ससूनचे डीन डॉ. काळेंनी सांगितली Inside Story
या प्रकरणात आजपर्यंत अनेक धागेदोर समोर आले आहेत. तसंच, या प्रकरणात राजकीय हस्तक्षेपही मोठ्या प्रमाणात होत आहे. मात्र, जे गुन्हेगार आहेत त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे. त्याचबरोबर त्यांना वाचवणाऱ्यांनाही शिक्षा झाली पाहिजे. यात आरोपी हे श्रीमंत असल्याने त्याला वाचवण्याचा कुणी प्रयत्न करत असेल तर त्याच्यावरही कारवाई झालीच पाहिजे असंही वडेट्टीवार म्हणाले आहेत.