पुणे : पुणे लोकसभेसाठी भाजपचे नेते आणि माजी आमदार जगदीश मुळीक (Jagdish Mulik) विरूद्ध काँग्रेसचे विद्यमान आमदार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) अशी थेट लढत होईल, शहराध्यक्ष म्हणून सांभाळलेल्या जबाबदारीमुळे जगदीश मुळीक पुण्यातून लोकसभेसाठी प्रबळ दावेदार मानले जात आहेत. (Pune Loksabha Election Jagdish Mulik Ravindra Dhangekar)
INDIA आघाडीची बुडणारी जहाज प्रियांका गांधींनी सावरली; महिन्याभरानंतर मिळाली Goodnews
2012 मध्ये मुळीक यांनी पहिल्यांदा काँग्रेसचा अभेद्य किल्ला मानला जाणाऱ्या वडगाव शेरीतून नगरसेवक म्हणून निवडून येत या मतदार संघात पहिल्यांदा कमळ फुलवले होते. हा जुना विजय पक्ष कधीच विसरणार नाही. त्यात मुळीक यांची गेल्या 10 वर्षात तरुण, कामसू, स्वच्छ प्रतिमेचे उमदे नेतृत्व अशी ओळख निर्माण झाली आहे. एवढेच नव्हे तर, आमदार झाल्यानंतर मुळीक यांनी शहराचा विकास करण्याबरोबरच 2017 मध्ये भाजपचे सर्वाधिक 14 नगरसेवकही निवडून आणत वडगाव शेरी भाजपचा बालेकिल्ला बनवला.
आणखी एका पुतण्याचे काकांना आव्हान! अजितदादांविरोधात शड्डू ठोकणारे युगेंद्र पवार कोण आहेत?
शहराध्यक्ष पदाची संधी मिळताच मुळीक यांनी पुणे शहराचा विकास करत संपूर्ण शहरभर कार्यकर्त्यांचे जाळे निर्माण केले. कोरोना सारख्या कठीण काळात पक्ष संघटनेच्या माध्यमातून संपूर्ण शहरभर रुग्ण सेवेचे केलेले उल्लेखनीय कार्य मुळीक यांनी यशस्वीरित्या पार पाडले. याशिवाय मुळीक यांनी आधुनिक पुण्याच्या निर्मितीसाठी मेट्रो, नदीसुधार व सुशोभीकरण प्रकल्प, नदीपात्रातील शिवणे ते खराडी रस्ता, उड्डाणपूल, रस्ते, 24 तास पिण्याची पाणी योजना या सर्व गोष्टींसाठी स्थानिक, राज्य तसेच केंद्र पातळीवर पुढाकार घेत यशस्वीपणे मार्गी लावण्यात मोलाची भूमिका निभावली आहे.
Lok Sabha 2024 : मनसे-भाजप युती फिक्स? राज ठाकरेंच्या शिलेदारानं सांगितली ‘खास बात’
मुळीक यांच्या या कौशल्यामुळे त्यांची संपूर्ण पुणे शहरात एक कामसू राजकारणी म्हणून ओळख निर्माण झाली आहे. मुळीक यांचा सोशल मीडियावरही मोठा फॅन फॉलोअर असून, मुळीक यांच्या कामाची पोहच पावती सोशल मीडियावर कमेंटच्या माध्यमातून मतदारांकडून वेळोवेळी दिली जात असते.