Download App

Pune LokSabha : मेधा कुलकर्णी राज्यसभेवर; असे सुटू शकते पुणे लोकसभेचे गणित

  • Written By: Last Updated:

पुणे : राज्यसभेसाठी भाजपने माजी आमदार मेधा कुलकर्णी (Medha Kulkarni) यांची उमेदवारी जाहीर केली आहे. भाजपचे संख्याबळ पाहता कुलकर्णी यांची खासदारकी निश्चित झाली आहे. त्यांच्या उमेदवारीमुळे पुणे लोकसभेची राजकीय गणितेदेखील बदलण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. ब्राह्मण समाज भाजपवर नाराज असल्याचा संदेश कसबा पोटनिवडणुकीमध्ये गेला होता. ही उणीव भरून काढण्यासाठी आता मेधा कुलकर्णी यांना मोठी संधी देण्यात आली आहे. मेधा कुलकर्णी यांच्या उमेदवारीमुळे आगामी काळात होणाऱ्या पुणे लोकसभेसाठी मराठा समाजाच्या उमेदवाराचा विचार केला जाऊ शकतो अशी शक्यता बळावली आहे. (Medha Kulkarni Gets Rajyasabha Ticket What Is The Stratergy For Pune Loksabha )

मोठा निर्णय! वैद्यकीय महाविद्यालयात इंटर्नशिप करणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणार दरमहा 18 हजार

आगामी काळात होणाऱ्या लोकसभेसाठी पुण्यातून माजी आमदार जगदीश मुळीक माजी महापौर मुरलीधर मोहोळ, माजी खासदार संजय काकडे हे तीन मराठा चेहरे प्रामुख्याने उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. याशिवाय माजी राष्ट्रीय सचिव सुनील देवधर यांनीही जोरदार तयारी केली आहे. मात्र, आता राज्यसभेसाठी मेधा कुलकर्णी यांच्या निमित्ताने भाजपने राज्यसभेसाठी ब्राह्मण उमेदवार पुढे केला आहे. त्यामुळे हे गणित बघता पुन्हा लोकसभेसाठी सुनील देवधर यांना संधी दिली जाणार का? यावर आता वेगवेगळी मते मांडली जात आहेत.

नांदेडला आता तीन खासदार, चव्हाणांसोबत राज्यसभेवर जाणारे गोपछडे नेमके कोण?

मेधा कुलकर्णी यांच्या उमेदवारीमुळे कोथरूड विधानसभा मतदारसंघाचेही गणितही पुढे आले आहे. कोथरूडचे विद्यामान आमदार असलेले चंद्रकांत पाटील हे राज्यात मंत्री आहेत. त्यात आता कोथरूडच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यापण आता खासदार होणार आहेत. याच मतदारसंघात भाजपनं मुरलीधर मोहोळ यांच्या रूपाने महापौरपद दिले होते. ही सर्व गणितं बघता आता मुळीक समर्थकांना वडगावशेरी मतदारसंघात खासदारकीची उमेदवारी मिळेल अशा अपेक्षा वाटत आहेत.

‘जरांगेंनी लोकसभा लढवावी, आमचा पाठिंबा राहिल’; प्रकाश आंबेडकरांचे आवाहन

मुळीकांनी सोपा केला होता भाजपचा अवघड पेपर

आगामी लोकसभेसाठी उमेदवारी मिळावी यासाठी जगदीश मुळीक हे इच्छूक आहेत. त्यांनी तशी इच्छादेखील बोलून दाखवली आहे. निवडणुकांपूर्वी मुळीक यांनी लोकसंपर्क वाढवण्यास सुरूवात केली आहे. यासाठी मुळीक यांच्याकडून अनेक कार्यक्रमांचेदेखील आयोजन केले जात आहे. फडणवीस यांचे खंदे समर्थक म्हणूनही मुळीक यांची प्रतिमा आहे.

राष्ट्रवादीच्या आधारवडाला काय मिळणार?; वडाचं झाड, कपबशी की शिट्टी; EC कडे तीन प्रस्ताव

भाजपसाठी अवघड असलेल्या वडगाव शेरी सारख्या मतदारसंघात मुळीक यांनी आमदारकी मिळवली होती. तसेच महापालिका निवडणुकीतही मोठ्या संख्येने नगरसेवक निवडून आणले होते. त्यामुळे लोकसभेसाठी आता कोथरूडचा नंबर मागे गेला असून, आता वडगाव शेरीला संधी मिळेल, असे गणित मुळीक समर्थक मांडत आहेत.

follow us