Download App

तिकीट कुणाला द्यायचे ते पार्लमेंट्री बोर्ड ठरवेल, लोकांनी आकाशात पतंग उडवू नये; देवधरांनी फटकारले

  • Written By: Last Updated:

Pune Loksabha : पुण्यातील माजी आमदार मेधा कुलकर्णी या भाजपकडून BJP राज्यसभेवर जाणार आहेत. तर पुणे लोकसभा मतदारसंघातून (
Pune Loksabha) निवडणूक लढविण्यासाठी अनेक जण इच्छूक आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रचारक आणि भाजपचे माजी राष्ट्रीय सचिव सुनील देवधरांचे (Sunil Deodhar) नाव आघाडीवर आहेत. ते निवडणुकीचे तयारीही करत आहेत. पण जातीय राजकीय बॅलन्स साधण्यासाठी येथून ब्राह्मण समाजाचा उमेदवार दिला जाणार नाही, अशी राजकीय चर्चा सुरू आहे. या चर्चा सुनील देवधरनी खोडून काढल्या आहेत. तिकीट कुणाचे द्यायचे ते पक्षाचे पार्लमेंट्री बोर्ड ठरवते. लोकांनी उगाच आकाशात पतंग उडविण्याचे कारण नाही, अशा शब्दात देवधरांनी फटकारले आहे.


मोफत सायकल वाटप योजनेचा लाभ कोणाला अन् कसा घेता येईल?

देवधर म्हणाले, भाजप पक्षामध्ये जातीवाद नाही. आम्ही कधी याला इथे मिळाले म्हणून तेथे तिकीट देणार नाही, असे भाजपमध्ये होत नाही. तुम्हा या पूर्वीचा पॅटर्न पाहा. गिरीश बापट जेव्हा खासदार झाले होते. तेव्हा राज्यसभेत कोण होते ते पाहा. असे काही नसते. आमच्या पक्षामध्ये सीट कोण काढू शकतो याला जास्त महत्त्व असते. जातीचा विचार केला तर हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले आहे.भाजप शेतकरी, युवा, महिला आणि गरीब या चार जातीचे राजकारण करणार आहे.

मेधा कुलकर्णी यांना राज्यसभा मिळाल्याने लोकसभेसाठी मराठा उमेदवार असावा, असा सूर भाजपमध्ये आहे. यावर देवधर म्हणाले, असा सूर भाजपमध्ये असल्याचे मला वाटत नाही. बाहेर कुणी बोलत असेल. मोदी यांना पुन्हा पंतप्रधान बनावचे आहे, यासाठी आम्ही काम करत आहोत. पक्ष ज्याला तिकीट देईल त्याला निवडून आणण्याचे आहे. माझी लढण्याची इच्छा आहे हे पूर्वीही मी सांगितले आहे. उमेदवारी मिळण्यासाठी इच्छा व्यक्त करणे चुकीचे नाही. तिकीट कुणाला द्यायचा हे पार्लमेंट्री बोर्ड ठरवेल. त्यामुळे पार्लमेंट्री बोर्डाचे निर्णय येऊपर्यंत लोकांना आकाशात पतंग उडविण्याचे कारण नाही, असे देवधर म्हणाले.

पुण्याचा खासदार कसा असावा असा पक्ष विचार करतो

मला वाटते पुण्याचा खासदार कसा असावा असा पक्ष पक्ष विचार करतो. हा खासदार पुण्याचा चेहरा असतो. तो लोकसभेत इंग्लिश, मराठी, हिंदी बोलू शकते. दिल्ली ज्याला ओळखतो, असा खासदार हवा आहे. बापट आजारी असताना आणि त्यांचे निधन झाल्याने वर्षभर पुण्याचे प्रश्न प्रलंबित राहिले आहेत. त्यामुळे पुण्याचे प्रश्नाची कोंडी आम्हाला फोडायची असल्याचे देवधर म्हणाले.

follow us