BSE बनला जगातील चौथ्या क्रमांकाचा शेअर बाजार, ‘या’ शेअर्सच्या जोरावर गाठला विक्रमी उच्चांक
Share Market : भारतीय शेअर बाजारामध्ये (Share Bazar)आज 19 फेब्रुवारीला सलग पाचव्या दिवशी वाढीसह बंद झाला. निफ्टी 50 ने आज 22 हजार 150.8 चा नवीन विक्रमी उच्चांक गाठला आहे. अंतरिम बजेट 2024 (Budget 2024)च्या एका दिवसानंतर, 2 फेब्रुवारीला केलेल्या उच्चांकांपेक्षा मोठा उच्चांक गाठला आहे. त्यानंतर आज पुन्हा 11 दिवसानंतर निर्देशांकाने (index)पुन्हा एकदा उच्चांक गाठला आहे.
अशोक चव्हाण भाजपमध्ये… काँग्रेस अन् अमित देशमुखांच्या डोक्यात काय सुरु आहे?
2024 च्या सुरुवातीपासून, निफ्टी-50 निर्देशांक सुमारे 2.1 टक्क्यांनी वाढला आहे. त्याचवेळी कामगिरीच्या बाबतीत आशियाई शेअर बाजारात भारतीय शेअर बाजार आघाडीवर आहे.
चित्रपटसृष्टीसाठी टर्निंग पॉईंट ठरलेल्या मिलन लुथरियांच्या ‘कच्चे धागे’चा रौप्य महोत्सव
2 फेब्रुवारीला केलेल्या उच्चांकांनंतर 11 ट्रेडिंग सत्रांमध्ये 6 शेअर्सचे सर्वाधिक योगदान आहे. हे सर्व 6 शेअर्स 10 टक्क्यांपेक्षा जास्त वाढले आहेत. 2 फेब्रुवारीपासून निफ्टी-50 च्या टॉप गेनर्सबद्दल बोलायचं झालं तर त्यात, BPCL, SBI, कोल इंडिया, विप्रो, M&M, बजाज ऑटो, मारुती आणि ONGC यांचा समावेश आहे.
दुसरीकडे, BSE चा प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स त्याच्या विक्रमी उच्चांकापासून 1 टक्क्यांनी मागे आहे. मात्र BSE वर लिस्टेड कंपन्यांचे सर्व शेअर्सचे बाजार भांडवल आता 392 लाख कोटी (सुमारे 4.7 ट्रिलियन) रुपयांवर पोहोचले आहे.
बीएसई आता एका महिन्यात दुसऱ्यांदा हाँगकाँगला मागे टाकून भांडवलाच्या बाबतीत जगातील चौथे सर्वात मोठे स्टॉक एक्सचेंज बनले आहे. यापूर्वी 23 जानेवारी 2024 रोजी, BSE ने प्रथमच हाँगकाँग स्टॉक एक्सचेंजला मागे टाकले आहे.