Pune Crime : पुण्यातील व्यक्तीला 250 वर्षांची शिक्षा, काय आहे प्रकरण जाणून घ्या?

पुणे : एखाद्या आरोपीने काही गुन्हा केला तर त्याला शिक्षा होतेच हे आपल्याला चांगल ठाऊक आहे. मग तो गुन्हा त्याच्या हातून मुद्दाम होवो की चुकीने, गुन्हा तो गुन्हाच मानल्या जातो. आपल्याच देशात नाही तर जगाच्या कानाकोपऱ्यात सुध्दा केलेल्या गुन्ह्याची शिक्षा ही अपराधी व्यक्तीला होत असते, अशाच एका पुण्यातील व्यक्तीला मध्य प्रदेशातील सिहोर जिल्हा न्यायालयाने शिक्षा […]

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 03 25T162007.110

Pune Crime

पुणे : एखाद्या आरोपीने काही गुन्हा केला तर त्याला शिक्षा होतेच हे आपल्याला चांगल ठाऊक आहे. मग तो गुन्हा त्याच्या हातून मुद्दाम होवो की चुकीने, गुन्हा तो गुन्हाच मानल्या जातो. आपल्याच देशात नाही तर जगाच्या कानाकोपऱ्यात सुध्दा केलेल्या गुन्ह्याची शिक्षा ही अपराधी व्यक्तीला होत असते, अशाच एका पुण्यातील व्यक्तीला मध्य प्रदेशातील सिहोर जिल्हा न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे.

शुक्रवारी सिहोर जिल्हा न्यायालयात ऐतिहासिक निकाल दिला आहे, चिटफंड कंपनी सुरू करून कोट्यवधी रुपये बुडवणाऱ्या साईप्रसाद कंपनीच्या संचालकाला न्यायालयाने 250 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. एवढेच नाही तर या कंपनीच्या सिहोर शाखेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही ५ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

बाळासाहेब भापकर असे 250 वर्षांची शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. भापकर यांच्यासह कंपनीचे सीहोर शाखेचे कर्मचारी दीपसिंग वर्मा, लखनलाल वर्मा, जितेंद्र कुमार आणि राजेश परमार यांनाही प्रत्येकी ५ वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. सिहोर जिल्हा न्यायालयाचे विशेष न्यायाधीश संजयकुमार शाही यांनी ही शिक्षा सुनावली. आरोपी बाळासाहेब भापकरने साई प्रसाद नावाने चिटफंड कंपनी स्थापन केला होता. या कंपनीच्या माध्यमातून ग्राहकांना ५ वर्षांत दुप्पट पैसे देण्याचे आमिष दाखवण्यात आले. यामुळे अनेकांनी या चिटफंड कंपनीत पैसे गुंतवले. मात्र पैसे जेव्हा देण्याची वेळ आली त्यावेळेस मात्र कंपनीतील कर्मचाऱ्यांनी कंपनीला कुलूप लावून पळ काढला.

मनसेचा शिंदे-भाजपा सरकारला इशारा, ‘…अन्यथा मनसैनिकांवर उत्खनन करण्याची वेळ आणू नका’

250 वर्षांची शिक्षा

कंपनीचे ग्राहक आपले पैसे घेण्यासाठी कंपनीच्या कार्यालयात पोहोचले तेव्हा समोरचे दृश्य पाहून त्यांना मोठा धक्काच बसला. या प्रकरणी 2016 मध्ये सीहोर पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला होता. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली. आता न्यायालयाने या कंपनीच्या संचालकाला 250 वर्षांची शिक्षा सुनावली आहे.

तो पुण्याचा रहिवासी

या चिटफंड कंपनीचे संचालक बाळासाहेब भापकर हे पुण्यातील रहिवासी आहेत. दीप सिंग वर्मा, राजेश उर्फ ​​चेतनारायण परमार, लखन लाल वर्मा आणि जितेंद्र कुमार वर्मा यांच्यासोबत तो ही कंपनी चालवत होता. या प्रकरणी बाळासाहेब भापकर यांना 250 वर्षांची शिक्षा झाली आहे. कंपनीतील कर्मचाऱ्यांना प्रत्येकी ५ वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. सध्या या शिक्षेची सर्वत्र जोरदार चर्चा आहे.

Exit mobile version