Download App

पुणे मेट्रोचा होणार विस्तार; ठाणे मेट्रोलाही केंद्राची मंजुरी; तब्बल पंधरा हजार कोटी निधी मिळणार

ठाणे इंटर्नल रिंग मेट्रोलाही रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंजुरी दिली आहे. या मेट्रोला 12 हजार 200 कोटी रुपयांचा निधी मंजूर.

  • Written By: Last Updated:

Swargate-Katraj Metro : गेल्या आठवड्यात रेल्वे विभागाने जालना ते जळगाव या 174 किलोमीटर रेल्वे मार्गाला मंजुरी दिली होती. त्यानंतर आता लगेच पुणे, ठाणे मेट्रोसाठी केंद्र सरकारने मोठा निधी मंजूर केलाय. पुणे मेट्रोच्या (Pune Metro) विस्ताराला केंद्र सरकारने मंजुरी दिली असल्याची माहिती केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री मुरलीधर मोहोळ (Muridhar Mohol) यांनी ट्वीटरवरून दिली आहे. आता पुणे मेट्रोचा स्वारगेट ते कात्रज (Swargate-Katraj Metro) असा विस्तार होणार आहे. त्यासाठी 2 हजार 954 कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आलाय. ही मेट्रो लाइन भुयारी असून, 5.46 किलोमीटर मार्ग असणार आहे. हा मार्ग वाहतुकीसाठी 2029 मध्ये खुला होणार आहे. या मार्गाचा फायदा मार्केट यार्ड, बिबेवाडी, कात्रजला होणार आहे.


मुख्यमंत्र्यांच्या प्रयत्नाला यश, ठाणे मेट्रोला निधी

ठाणे इंटर्नल रिंग मेट्रोलाही रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंजुरी दिली आहे. या मेट्रोला 12 हजार 200 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलाय. ठाण्यात रिंग मेट्रो प्रकल्पाची अंमबजावणी करण्याची योजना एमआयआरसीएने आखलीय. मुख्यमंत्री एकनाथ यांनी हा प्रकल्प केंद्राकडे मंजुरीसाठी पाठविला होता. त्याला आता मंजुरी मिळालीय. 29 किमी लांबीचा हा मेट्रो प्रकल्प आहे. तब्बल 22 स्थानकांची योजना आहे. या रिंग मेट्रोचा वापर ठाण्याच्या गर्दीच्या ठिकाणापासून ते घोडबंदर आणि इस्टर्न एक्सप्रेस हायवे या दरम्यानचा दुवा म्हणून होईल. तसेच मध्य रेल्वेचे ठाणे रेल्वेस्थानक ते ठाणे परिसरात जाण्यासाठी पर्यायी मार्ग म्हणून या मेट्रोचा वापर होईल. तर कासारवडवली येथे या मेट्रोचा कारशेड उभारण्याची योजना आहे.


22 स्थानके

या मार्गावर एकूण 22 स्थानके आहेत. 2 स्थानके अंडरग्राऊंड असतील. जुने ठाणे, नवीन ठाणे, रायलादेवी,वागळे इस्टेट सर्कल, लोकमान्य नगर बस स्टेशन, पोखरण-1, उपवन, गांधीनगर, काशीनाथ घाणेकर ऑडीटोरिएम, मानपाडा, पाटीलपाडा, डोंगरीपाडा, विजय नगरी, वाघबिळ, हिरानंदानी इस्टे़ट, ब्रह्मांड, आझादनगर बस स्टॉप, मनोरमा नगर, कोलशेत,बाळकुम नाका, साकेत, शिवाजी चौक असे स्थानके असणार आहेत.

follow us

संबंधित बातम्या