‘त्या’ अफवा असून, भाजप माझ्यावर अन्याय करणार नाही, मला उमेदवारीची खात्री; रामभाऊ दाभाडेंना विश्वास
Rambhau Dabhade: कुणीही काही अफवा पसरविल्यातरी त्याकडे लक्ष न देता आपण लोकांपर्यंत जाण्याचे ठरविले आहे. मी निवडणूक लढणार.
Rambhau Dabhade : पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेसाठी भाजपमध्ये अनेकांचा प्रवेश होत आहे. त्यामुळे निवडणुकीचे गणितही बदलत आहे. नवीन प्रवेशामुळे इच्छुकांचे संख्येही वाढत आहे. तशीच परिस्थिती पुणे महानगरपालिकेत (Pune Municipal Corporation Election 2025) प्रभाग तीनमध्ये झालेली आहे. या प्रभागातील उमेदवार वाघोलीचे माजी सरपंच व माजी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रामभाऊ दाभाडे (Rambhau Dabhade) यांच्यासमोर काही अडचणी उभ्या राहिल्या आहेत. माझ्या उमेदवारी निश्चित असून, कुठल्याही परिस्थितीत मी निवडणूक लढविणार आहे. पक्ष माझ्यावर अन्याय करणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. (Pune Municipal Corporation Election 2025 Rambhau Dabhade bjp)
नागरिकांचा कौैल घेतला तर पक्ष कधीच डावलणार नाही…
वाघोली, विमाननगर या वार्डात काही राजकीय घडामोडी घडल्यात. काही इच्छुकांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय. त्यामुळे रामभाऊ दाभाडे यांना दगाफटका होणार का ? यावर ते म्हणाले, विमाननगर, लोहगाव, वाघोली या प्रभाग तीनमध्ये जरी प्रवेश झाला असला तरी भारतीय जनता पक्षाच्या निष्ठांवत कार्यकर्त्याला डावलणार नाही, याची गॅरंटी मला आहे. विमाननगर, लोहगाव परिसरातील नागरिकांचा मला कौल आहे. नागरिकांचा कौल घेतला तर पक्ष कधीच मला डावलणार आहे. कोणीही प्रवेश घेतला तरी हा पक्ष मोठा आहे. आमच्या पक्षात येणाऱ्या सर्वांचे आम्ही स्वागत करतो. सर्वांना बरोबर घेऊन ही निवडणूक लढविणार आहे. मी माझ्या कार्यकर्त्याचा मेळावा घेऊन सांगितले आहे आपण कुठल्याही परिस्थितीत प्रभाग तीनमधून निवडणूक लढविणार आहे. कुणीही काही अफवा पसरविल्यातरी त्याकडे लक्ष न देता आपण लोकांपर्यंत जाण्याचे ठरविले आहे. त्यासाठी प्रचार यंत्रणा राबवत आहे. ती यंत्रणा तशीच चालू ठेवून सर्वापर्यंत पोहचणे अशी कार्यकर्त्यांना मेळावा घेऊन विनंती केलेली आहे.
मी कधीच गाफील राहत नाही-दाभाडे
माझे कार्यकर्ते सतर्क आहेत. कुणी प्रवेश केला म्हणून मी कधीच गाफील राहत नाही. कारण वीस-पंचवीस वर्षांपासून मला निवडणुकीचा अनुभव आहे, असे प्रसंग अनेकवेळा मला आलेले आहे. त्यामुळे मी गाफील कार्यकर्ता नाही. हे माझ्या कार्यकर्त्यांना माहिती आहे. मी शंभर टक्के निवडणूक लढविणार आहे. भाजप माझ्यावर अन्याय करणार नाही, मला याचा विश्वास आहे, असे दाभाडे म्हणाले.
ठरलं! 26 तारखेला ‘तुतारी’ जोरात वाजणार; अजितदादा कार्यकर्त्यांसाठी करणार मनोमिलनाची घोषणा
मला नागरिकांचा चांगला प्रतिसाद
दोन-तीन महिन्यात मला नागरिकांचा प्रतिसाद चांगला आहे. वीस-पंचवीस वर्षांपासून वाघोली परिसरात केलेली कामे आहेत. त्या ठिकाणी विमानगर परिसरातील नागरिकांच्या अडचणी सोडविण्याचे प्रयत्न करत आहे. पाणी, ड्रेनेजच्या समस्या सोसायटी बेसला सोडविण्याचा प्रयत्न केला आहे. लोहगाव परिसरात लोकांना तात्पुरते रस्ते करून देण्याचे काम केले. लोकांचा चांगला प्रतिसाद आहे. लोकांची भावना अशी सर्वसामान्य माणूस असेल तर ज्याच्याकडे 24 तास आपण जावू शकतो, असा माणूस नगरसेवक म्हणून लाभला तर आम्ही त्याचच पाठीशी राहणार, अशी लोकांची भावना आहे. त्यामुळे लोक माझ्या चांगल्या संपर्कात झालेले आहेत. या प्रभागात शंभर टक्के विजयाची खात्री असल्याचा दावा दाभाडे यांनी केलाय.
केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याशी भेट घेतलेली आहे. शहराध्यक्ष धीरज घाटे, ग्रामीणचे अध्यक्ष प्रदीप कंद, शहराचे प्रभारी गणेश बीडकर, आमदार राहुल कुल असतील, यांच्या गाठीभेटी घेतल्या आहे. त्यांनी विश्वास दिलेला आहे तू काम कर, काम असेच सुरू ठेव आहे. तिकीटाची, उमेदवारीची खात्री दिलीय. त्यामुळे मी लोकांमध्ये जात आहे, असे दाभाडे म्हणाले.
